चहार्डी येथे जागतिक महिला दिवस साजरा
चोपडा (विश्वास वाडे) कौशल्य विकास व उदयोजकता मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान जळगाव महिला आर्थिक विकास महामंडळ जळगाव व चहार्डी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिवस चहार्डी येथे साजरा करण्यात आला. सपना टाटिया यांनी योगसाधना व महिलांचे आरोग्य विषयावर प्रात्यक्षिकांसह महिलांना मार्गदर्शन केले.
जन शिक्षण संस्थानचे संचालक रवींद्र कुडाळकर यांनी जन शिक्षण संस्थानच्या स्वयंरोजगार प्रशिक्षण प्रकल्पाची माहिती दिली. महिला आर्थिक विकास महामंडळाचे सलीम तडवी यांनीही त्यांच्या विविध योजनांची माहिती दिली. जन शिक्षण संस्थानचे विविध उपक्रम चहार्डी येथे राबविण्यात येत असून भविष्यातही नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. अध्यक्ष चंद्रकलाताई पाटील, सरपंच चहार्डी यांनी महिलांनी सक्षम होत आपला व्यक्तिमत्त्व विकास करण्याचे आवाहन केले समाजात विविध क्षेत्रात भरीव कार्य करत असल्याबद्दल महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत साळुंखे, विकास भदाणे, योगेश पाटील, संजीव सोनवणे, मनोहर पाटील, राजश्री पाटील, पुनम पाटील, अशोक पाटील, अरुण कंखरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रम जन शिक्षण संस्थानच्या अध्यक्ष डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.