प्रा.सारंग नागठाणे यांच्या विद्यार्थिनींना राष्ट्रीय चित्र प्रदर्शनीमध्ये गोल्ड, सिल्वर, ब्राँझ मेडल
अमरावती (पंकज मालवीय) प्रतिरूप आर्ट फाउंडेशन राजस्थान ललित कला अकादमी संयुक्त तत्वावधान आयोजित राष्ट्रीय चित्र प्रदर्शनी कोटा, जयपुर दूसरे वर्षाचे उद्धघाटन कोटा आर्ट गैलरी सासंद विधायक भरत सिंह व वरिष्ठ चित्रकार तथा कोटा विश्वविद्यालयाची मागिल डिन अर्चना कुलश्रेष्ठ यांच्या हस्ते तिनं दिवसीय राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
या चित्रकला प्रदर्शनीमध्ये आग्रा, नाशिक, गुडगाव, दिल्ली, अमरावती, पाडीचरी या गावातुन एकुन २०० चित्रकार सहभागी झाले होते. त्यामध्ये स्टोन, वुड, मार्बल आणि स्कल्पचर या विषयावर होते. त्यामध्ये श्री आर्ट कलेचे एकून १५ विद्यार्थी सहभागी झाले होते व व्यावसायिक विभागात सारंग नागठाणे भाग घेतला होता. त्यामध्ये श्री आर्ट कला वर्गाला विद्यार्थी विभाग मध्ये चार पुरस्कार मिळाले कु.मुक्ता विष्णू वाघला गोल्ड मेडल मिळाले, कु.सिध्दी दिपक वर्हाडेला सिल्व्हर मेडल मिळाले, कु.वैष्णवी दादाराव पाटणकरला ब्रॉनझ मेडल मिळाले व व्यावसायिक विभागात प्रा.सारंग नागठाणे यांना गोल्ड मेडल मिळाले. वैषाली विजय इंगळे उत्कृष्ट चित्रकलाकारचा पुरस्कार मिळाला आहे. प्रतिरूप आर्ट फाऊंडेशन संचलित या स्पर्धेत सर्वात जास्त पुरस्कार श्री आर्ट कलाला मिळाले आहे.
चित्रकला प्रदर्शन बघण्यासाठी आलेले चित्रकार व कोटा शहरातील स्थानिक लोकांना श्री आर्ट कला वर्गातील विद्यार्थीचे काम खुप आवडले हे चित्रकला प्रदर्शन तीन दिवस होते. राजस्थान ललित कला अकादमी के सचिव डॉ. रजनिश हर्ष, समाजसेवी अमित धारीवाल, संस्थापकअमित विजय सह संस्थापक शिवानी शर्मा यांच्या हस्ते कला. वर्गातील विद्यार्थीना बक्षीस देण्यात आले कला वर्गातील १० विद्यार्थीचे काम एवढ्या दुर गेले पाच राष्ट्रीय पुरस्कार घेणारे एक मेल करा वर्ग ठरले आहे कला वर्गातील या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. त्यामध्ये खासदार अनंत गुढे, दैनिक हिंदुस्तान चे संपादक विलास मराठे, संतोष बद्रे, अमोल इंगळे, विकास नागठाणे, अभिषेक लोखंडे, प्रकाश लोखंडे, आदींनी कला वर्गातील विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.