महाराष्ट्र

साप्ताहिक राशिभविष्य, २४ एप्रिल २०२२ ते ३० एप्रिल २०२२ !

मेष : राशीतील राहूभ्रमण कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सार्वजनिक जीवनातून खराब. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट जपाच. बाकी स्वतंत्र व्यावसायिकांना सप्ताह शुभ ग्रहांच्या साथसंगतीचा. अश्‍विनी नक्षत्रास सप्ताह पूर्वसंचितातून लाभ देणारा. ता. २७ व २८ हे दिवस दैवी चमत्काराचे. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार चोरीचा.

वृषभ : सप्ताहातील गुरू-शुक्राची खेळी मोठी नावीन्यपूर्ण राहील. बुद्धिजीवी मंडळींना मोठे लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ. व्यावसायिक मोठे करारमदार. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट न दिसणाऱ्या सूर्यग्रहणाच्या पार्श्‍वभूमीवर खराब. एखादे संशयपिशाच्च सतावेल. कुसंगत अंगाशी येईल.

मिथुन : शनीचं राश्‍यांतर आणि गुरू-शुक्राचा सहयोग सप्ताहाचं पॅकेज घोषित करतील. तरुणांना सप्ताह अतिशय शुभसूचक ! मृग नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या उत्तम संधी. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे सन्मान मिळतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह दैवी प्रचितीचा.

कर्क : ग्रहांची फिल्डिंग घट्ट होणार आहे. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाचा आरंभ आणि शेवट जपलाच पाहिजे. सप्ताहाचा शेवट न दिसणाऱ्या सूर्यग्रहणातून नोकरीत ताणतणावाचा. बाकी सप्ताहातील गुरू-शुक्राचे अंडरकरंट कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यता. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार खर्चाचा.

सिंह : सप्ताहाचा प्रारंभ उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शत्रुत्वाच्या पार्श्‍वभूमीवर लक्षणं दाखवणारा. बाकी ता. २७ व २८ हे दिवस उत्तम व्यावसायिक उलाढालींचे. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सूर्यग्रहणाच्या पार्श्‍वभूमीवर मातृपितृचिंतेचा. दुखापती सांभाळा.

कन्या : सप्ताहात गुरू-शुक्राचे अंडरकरंट कुयोगांवर मात करणारं. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २७ ते २८ हे दिवस व्यावसायिक धनवर्षाव करतील. नवपरिणितांचे भाग्योदय होतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाता भाजण्या – कापण्यापासून जपावं. शनिवारचं न दिसणारं सूर्यग्रहण सांभाळावं.

तूळ : सप्ताहातील राहूचा अंडरकरंट वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर खराब. काहींना राजकीय दहशत सतावेल. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट नोकरीत अस्वस्थतेचाच. बाकी गुरू-शुक्राची विशिष्ट स्थिती शैक्षणिक चिंता घालवेल. ता. २७ व २८ हे दिवस चित्रा आणि विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक सुवार्तांचेच.

वृश्‍चिक : सप्ताह पूर्णपणे गुरू-शुक्राच्या अखत्यारीतला राहील. अर्थातच तरुणांना धार्जिणा राहील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमातून उत्तम साथ देणारा सप्ताह. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार आणि सप्ताहाचा शेवट अकारण वाद वाढवेल. सांभाळा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून लाभ.

धनू : सप्ताहात शुभ ग्रहांच्या मंत्रालयांतून लाभ होतील. ता. २७ ते २९ हे दिवस चढत्या क्रमाने शुभ. म्हणाल ते होईल. बाकी सप्ताह गर्भवतींना संवेदनशील राहील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह अलौकिकच. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र जागरणाचा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पोटदुखी.

मकर : सप्ताहातील ग्रहमान मानसिक पर्यावरण बिघडवणारेच. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट विचित्र ग्रहसमीकरणांचा. जुनाट व्याधींचा उद्‌भव होऊ शकतो. पथ्यं पाळा. बाकी सप्ताहातील गुरू-शुक्राची विशिष्ट स्थिती तरुणांना पोषकच. उत्तराषाढा व्यक्तींना ता. २७ व २८ हे दिवस सुवार्तांचे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक मोठी प्राप्ती.

कुंभ : सप्ताहात शनीचं आपल्या राशीत आगमन होईल. अर्थात गुरू-शुक्राची विशिष्ट स्थिती आपणास साडेसातीच्या झळा सध्या पोचवत नाहीये. सप्ताह धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा लाभदायी ठरणार आहे. ता. २७ व २८ हे दिवस गंमतशीर लाभ देतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर लक्षणं दाखवेल.

मीन : गुरूचं राशीत झालेलं आगमन शुक्राच्या संगतीत चांगलंच बोलणार आहे. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती प्रचंड फॉर्मात येतील. तरुणांच्या चिंता संपतील. नोकरीतील एक सुंदर पर्व सुरू होईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचं सूर्यग्रहण चोरी-नुकसानीचं. संध्याकाळ वादाची.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे