महाराष्ट्र
गुरु बाळकृष्ण महाराज सुडके नेवासा यांचे भागवत कथा सप्ताहाचे आयोजन
देगाव (श्रीकांत कोळी) शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथे गिरासे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रावसाहेब रजेसिंग गिरासे यांच्यातर्फे, हरी भक्त पारायण, गुरु बाळकृष्ण महाराज सुडके नेवासा यांचे भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये गावातील विवाहीत, ज्येष्ठ व मुला-मुलींनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला व डोक्यावर भागवत कथा घेऊन तसेच मुलींनी डोक्यावरती घागर घेऊन व मुलांनी देखील ध्वज घेऊन संत मीराबाई पालखी असे मिरवणूक काढण्यात आली. यावेळी देगाव गावातील भजनी मंडळ, तसेच देगाव गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिति होती. तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. देगाव गावातील संपुर्ण नागरिकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला.