तळोदा तालुका भाजपा अध्यक्षपदी प्रकाश वळवी यांची निवड
बोरद (योगेश गोसावी) तळोदा तालुका ग्रामीण भाजपा तालुकाध्यक्षपदी राणीपुरचे ग्राम पंचायत सदस्य प्रकाश आमश्या वळवी यांची निवड करण्यात आले. निवड पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आपली नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या तळोदा ग्रामीण तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करीत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बलशाली भारत, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असाल यासह भारतीय जनता पार्टीचे विचार, ध्येय, धोरण सर्व सामान्य लोकांपर्यंत आपण पोचविण्याकरिता व संघटन वाढीसाठी आपण प्रयत्नशील असाल यासाठी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. आपले अभिनंदन सह शुभकामना नियुक्ती पत्रात केली आहे. याप्रसंगी तळोदा पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, शहादा-तळोदा विधान क्षेत्र प्रमुख नारायण ठाकरे, दारा वसावे, सावरपाडा सरपंच महेंद्र पवार, योगेश गोसावी आदी उपस्थित होते.