शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथे ‘शाळापूर्व तयारी मेळावा’ उत्साहात संपन्न
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील जि.प.शाळेत पहिलीच्या वर्गासाठी दाखलपात्र बालकांची शाळापूर्व तयारी करुन घेण्यासाठी ‘शाळापूर्व तयारी अभियान’ राज्यभर व तालुक्यात राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरीय शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयेजन पाटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी सि.एस. खर्डे यांनी केले.
सन 2022-23 मध्ये इयत्ता पहिलीसाठी दाखलपात्र बालकांनी व त्यांच्या पालकांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदविला. हे अभियान साधारणपणे 8 ते 10 आठवडे घेण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थी यांनी प्रवेश घेणाऱ्या बालकांना आणि सोबत आलेल्या पालकांना मार्गदर्शन केले.
शाळा पूर्व तयारी म्हणजे लावलेल्या स्टॉल वर विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांची चाचपणी करण्यात आली. आणि मेळाव्यास गावातील प्रवेश पात्र बालकांसह पालकांनी उस्फुर्त सहभाग मोठ्या संख्येने नोंदवला होता.
स्टॉल क्र.१) नाव नोंदणी
या स्टॉलवर प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
स्टॉल क्र. 02) वजन उंची
विद्यार्थ्यांचे वजन व उंची मोजण्यात आली व त्याची नोंद घेण्यात आली.
स्टॉल क्र. 03) शारीरिक विकास
या स्टॉलवर विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमता तपासण्यात आल्या. अंक ओळख,, दोरीवरच्या उड्या मारणे चित्र रंगवणे इत्यादी कृती यात घेण्यात आल्या.
स्टॉल क्र. 04) बौद्धिक क्षमता
या स्टॉल वर विद्यार्थ्यांना रंग आकार प्राणी पक्षी फुले फळे भाज्या इत्यादींचे वर्गीकरण करणे या क्षमता अवगत आहेत की नाही याबद्दल तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तथा समई दीप प्रज्वलित करून करण्यात आली. प्रास्ताविक मीनल पाटील यांनी त्यानंतर राजेंद्र शिंपी यांनी शाळेतील नियोजन, व्यवस्थापन, आगामी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया दाखल पात्र विद्यार्थ्यां साठी राबविले जाणारे उपक्रम याबाबत सविस्तरमाहिती दिली.
प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी खर्डे यांनी सांगितले की गेल्या दोन वर्षापासून कोरोना महत्त्वाचे च्या प्रकोपामुळे शाळा बंद होत्या. दरम्यान च्या काळात अंगणवाडी तथा पूर्व प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे खूप शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थी अभ्यासात स्थूल झाले असून त्यांना पुन्हा नव्या जोमाने शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग यांनी कंबर कसली असून पालकांनीही आपल्या पाल्यांना दररोज शाळेत पाठविणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यानंतर साधन व्यक्ती तथा तालुका समन्वयक संजय धिवरे यांच्या हस्ते शैक्षणिक क्षमता कृती स्टॉलचे रिबीन फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यानंतर प्रत्यक्ष मेळाव्यास सुरुवात करण्यात आली. मेळाव्यात विविध शैक्षणिक कृतींचे ७ स्टॉल लावण्यात आले होते. विद्यार्थी व शिक्षिका यांच्या समवेत त्यांनी प्रत्येक स्टॉल बाबत कुतूहलाने माहिती जाणून घेतली. दरम्यान त्यांनी मेळावा नियोजनाबाबत सर्वांचे कौतुक ही केले. मेळावा साठी सूत्र संचालन राजेंद्र शिंपी तर आभार विजय पाटील यांनी मानले. यावेळी मीनल पाटील,म च्छिंद्र कासार, व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी, परिसरातील शिक्षकवर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.