“बाला” उपक्रम अंतर्गत जि.प.शाळा गारखेडा येथे वृक्षारोपण.
दिनांक:०४ आँगस्ट २०२२ जामनेर:प्रतिनिधि
जि.प.कडून सुरु असलेले “बाला” उपक्रम जि. प.शाळेत राबविले जात आहे तसेच “आजादी का अमृत महोत्सव” उपक्रम अंतर्गत शासनाने दिले आदेशा प्रमाणे “हर घर तिरंगा” मुहीम या वर्षी ७५ व्या स्वातंत्र दिवसानिमित्स राबविली जाणार आहे. सदर मुहीमची जनजागृती ही जि.प.शाळेचे शिक्षक लोकांपर्यंत पोहोचवतात आहे.
‘बाला’ हा शैक्षणिक उपक्रम आहे. निरीक्षण क्षमता, आणि तर्क क्षमतेचा सुरेल संगम म्हणजे ‘बाला’. बाला म्हणजे BALA : Building As Learning Aid अर्थात इमारतीचा शैक्षणिक कार्यासाठी उपयोग होय.बाला उपक्रमांतर्गत शालेय बांधकाम, रंगरंगोटी, शाळा परिसर, नाविन्यपूर्ण उपक्रम व समाज सहभाग वृक्षारोपण या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे.त्या अनुषंगाने काल दि.०३ रोजी जि.प.शाळा गारखेेेेडा ता.जामनेर येथे २२ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
सदर प्रसंगी प्रहार शिक्षक संघटना चे जिल्हा अध्यक्ष सलीम शेख. मुख्याधयापिका छाया सूर्यवंशी, शिक्षकगण अरुण पारिस्कर, सिद्देश देशपांडे , रंजना इंगळे,नंदा आपार,अर्चना महाजन, कविता चौधरी हे उपस्थित होते.