नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी सोडवण्यासाठी पोलीस विभागाकडून तक्रार निवारण दिनाचे आयोजन.
दिनांक ६ ऑगस्ट २०२२ रोजी भुसावळ शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेदरम्यान होणार तक्रार निवारण- डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे.
दिनांक: ०४ आँगस्ट २०२२
भुसावळ: प्रतिनिधि-अखिलेशकुमार धिमान.
भुसावळ शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की डॉक्टर प्रवीण मुंढे,जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या सूचनेनुसार दिनांक ६ ऑगस्ट २०२२ रोजी भुसावळ शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेदरम्यान तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आलेला आहे.
भुसावळ शहर पोलीस स्टेशन, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन,त्याचप्रमाणे भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील ज्या नागरिकांनी पोलीस स्टेशन कडे काही तक्रार अर्ज केलेले असतील त्यांनी तसेच नागरिकांच्या अन्य स्वरूपाच्या तक्रारी असतील तर सदर नागरिकांनी सकाळी दहा ते दोन या दरम्यान भुसावळ शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर राहावे.
अवैध सावकारी बाबत तोंडी स्वरूपात अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. ज्याही नागरिकांना व्याजाने पैसे देऊन कोणी वसुलीसाठी व अन्य मार्गाने त्रास देत असेल, व्याजाने दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी अशा सावकाराने एटीएम कार्ड ठेवून घेतले असेल वा जमिनीचे,घराचे कागदपत्र स्वतःच्या ताब्यात ठेवून घेतले असतील अशा नागरिकांनी देखील कोणतीही भीती न बाळगता या तक्रार निवारण दिवशी हजर राहून आपली तक्रार मांडावी.
तसेच ज्या ही नागरिकांच्या पोलीस पोलीस विभागाकडे यापूर्वी काही तक्रारी प्रलंबित असतील त्यांनी त्याचप्रमाणे ज्यांच्या पोलीस विभागाची निगडित तक्रारी असतील त्यांनी उद्याच्या तक्रार निवारण दिवशी समक्ष व प्रतिनिधी मार्फत हजर रहावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे…