भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे महागाईचा भडका महागाईच्या विरोधात जनतेने रस्त्यावर यावे : आ. कुणाल पाटील
धुळे : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे, त्याचे परिणाम भारतीय जनता पक्षाला भोगावे लागतील. त्यामुळे देशातील जनता केंद्रातील भाजपा सरकारला घड़ा शिकविल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महागाई वाढविणार्या भाजपा सरकार आणि महागाईच्या विरोधात जनतेने आता रस्त्यावर उतरावे असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी केले आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांची प्रचंड प्रमाणात दरवाढ करुन देशात महागाई वाढविली आहे. अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, राष्ट्रीय नते राहूल गांधी यांनी महागाईमुक्त भारत आंदोलनाची हाक दिली आहे. त्याअनुषंगाने आज धुळ्यात महाराष्ट्राचे माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील, जिल्हा प्रभारी माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, सह प्रभारी प्रदिप राव यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील हे धरणे आंदोलन धुळ्यातील क्यूमाईन क्लब येथे दि.४ एप्रिल रोजी सकाळी ११ वा आयोजित करण्यात आले होते. महागाई वाढल्याने केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत पदाधिकार्यांनी निषेध नोंदविला. यावेळी मार्गदर्शन करतांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी सांगितले कि, केंद्रातील भाजपा सरकारने महागाईचा भस्मासूर बसवून सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याने काम केले आहे. निवडणूकीत नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते निवडणूकिनंतर सामान्य जनेताला विरसले आहेत.
धरणे आंदोलनात बोलतांना जिल्हा प्रभारी माजी मंत्री डॉ.शोभाताई बच्छाव केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेच्या कल्याणकारी योजना बंद केल्या महागाई वाढवून उद्योगपती आणि त्यांच्या मित्रांचे खिरे भरण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे. काँग्रेसने नेहमीच शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढा दिला आहे. यावेळी त्यांनी शेवटी केंद्र सरकार आणि वाढत्या महागाईचा निषेध व्यक्त केला. महागाईमुक्त भारत आंदोलनात काँग्रेस कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी सांगितले कि, देशात महागाई वाढल्याने जनतेचे जगणे असह्य झाले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी होत असतांना पंतप्रधार पेट्रोल डिझेलचे भाव दररोज वाढवित आहेत. भाववाढ करु जनतेला लुबाडण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे. मतांसाठी भाव कमी करणे आणि निवडणूका संपल्या की महागाई वाढविणे असे स्वार्थी राजकारण भाजपा करीत आहे. चुकीचे धोरण आणि महागाई विरोधात आवाज उठविणार्यांचा आवाज दाबण्याचे काम केंद्रातील सरकार करीत असते. मात्र काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करेल आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उरतल्याशिवाय राहणार नाही असे आ. कुणाल पाटील यांनी शेवटी सांगितले.
आंदोलात धुळे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आ प्रा. शरद पाटील, जिल्हा काँग्रेसचे सचिव डॉ. दरबारसिंग गिरासे, अँड मोहन पाटील, डॉ. दत्ता परदेशी, पंढरीनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्याक्रमाला माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील, जिल्हा प्रभारी माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, सह प्रभारी प्रदिप राव, महाराष्ट्र काँग्रेस कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शामभाऊ सनेर, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आ.प्रा. शरद पाटील, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, काँग्रेसचे सचिव डॉ. दरबारसिंग गिरासे, मार्केट मुख्य प्रशासक रितेश पाटील, महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, डॉ. अनिल भामरे, माजी जि.प. सदस्य रणजित पावरा, माजी जि.प. सदस्य साहेबराव खैरनार, इंटक अध्यक्ष प्रमोद सिसोदे, डॉ. दत्ता परदेशी, शिंदखेडा येथील प्रकाश पाटील, आबा मुंडे, महेंद्र पाटील, प्रमोद बोरसे, समद शेख, प्रविण पाटील, अमोल बोरसे, भाईदास धनगर, देवेंद्र पाटील, राजेंद्र देवरे, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव पाटील, साक्री तालुका काँग्रेसचे नंदुभाऊ खैरनार, प्रज्योत दोसल किशार पाटील, पी. एस. पाटील, अॅड. मोहन पाटील, शिरपुर काँग्रेसचे उत्तमराव माळी, मनोहर पाटील, धुळे तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, रावसाहेब पाटील, अरुण पाटील, बापू खैरनार, कुलदिप निकम, हसण पठाण, संभाजी गवळी, शहर काँग्रेस महिला अध्यक्षा बानुबाई शिरसाठ, दिनकर देवरे, डॉ. विजय देवरे, दिलीप बिरारी, छोटूभाऊ चौधरी, माजी सरपंच भटू चौधरी, सरपंच पांडूरंग मोरे, किर्तीमंत कौठळकर, युवक काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंके, ज्ञानेश्वर मराठे, प्रदेश सरचिटणीस पंकज चव्हाण, लंकेश पाटील, जितेंद्र पवार, शकील अहमद, ज्येष्ठ नेते मुकंद कोळवले, सतिष रवंदळे, ऋषी ठाकरे, किरण नगराळे, दिनेश देसले, अशोक राजपूत, अविनाश महाजन, मनोहर पाटील, योगेश पाटील, माजी नगरसेवक सदाशिव पवार, शिवाजी अहिरे, प्रविण माळी यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.