दिव्यांग बांधवांकडून जागतिक महिला दिन साजरा
धुळे (प्रतिनिधी) अपंग पुनर्विकास संस्था संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिन व धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा धुळे जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ शेवतकर यांनी भुषविले प्रमुख मान्यवर म्हणुन राष्ट्रवादीचे धुळे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले, पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. विशालजी ठाकुर, उपाध्यक्ष मनोजभाऊ गर्दे, एकविरा व्हिजनचे ओमजी शर्मा, दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष गौतमभाऊ पगारे, अपंग पुनर्विकास संस्थेचे सचिव राहुलजी याज्ञिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कामाने वेगळी छाप सोडणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात 1) उपमहापौर व विद्यमान नगरसेविका कल्याणीताई अंपळकर (शेकडो महिला भगिनीना उज्वला गॅस योजनाचा लाभ मिळवून दिला व बचतगटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला 2) महिला बालकल्याण सभापती व नगरसेविका वंदनाताई थोरात (शेकडो महिला भगिनीना कोरोणा काळात शिवणयंत्र उपलब्ध करुन दिले. 3) सुरेखाताई नांद्रे (धाराऊ वृक्ष संवर्धन समितिच्या माध्यमातून निरंतर वृक्षारोपण व संवर्धन कार्य 4) उर्मिलाताई पाटील (शिक्षिका व वृक्षारोपण व संवर्धन कार्य 4) अँड कविताताई पवार (दिव्यांग क्षेत्रात सक्रिय व समाजसेविका 5) नाजनीनताई शेख (अल्पसंख्यक महिला साठी कार्य व सामाजिक कार्यकर्ता 6) शितलताई चव्हाण (दिव्यांग क्षेत्रात सक्रिय व बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण 6) बायजाबाई बागुल (महिला रिक्षा चालक) 7) रागिनीताई मराठे (उत्कृष्ट गायिका) 8) मनिषाताई बागुल (दोन्ही पाय अपघातात निकामी पण परिस्थिती वर मात करत मेस व्यवसाय चालवत आई वडिलांचा सांभाळ केला. या सत्कारार्थी महिलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच मराठी पत्रकार संघाच्या सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अपंग पुनर्विकास संस्थेचे अध्यक्ष संजय बाबा सरग, एजाज शेख बाजीराव खैरनार, गिताजी कटारिया, सरलाताई सुर्यवंशी, जोत्सनाताई मोरे, विनोद खेमनार, कैलास वाडिले, नुतनताई चौधरी, दिपालीताई धनगर, मिना ताई धनगर, मालतीताई बोरकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा मंडळ सरचिटणीस चंद्रकांत भामरे व दिग्विजय गाळणकर यांनी केले. शेवटी अपंग पुनर्विकास संस्थेचे अध्यक्ष संजय बाबा सरग यांनी आभार मानले.