चोपडा तालुक्यातील सनपुले गावात एका माकडाचा चिंचेचा झाडावरून पडून मृत्यू
चोपडा (सिद्धार्थ बाविस्कर) जंगली किंवा पाळीव प्राण्यांबाबत आपल्यातील अनेक लोक खूपच भावूक असतात. प्राण्यांना एखादी जखम झाली, तरी त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. अशीच एक मनाला स्पर्श करणारी घटना चोपडा तालुक्यातील सनपुले गावात घडली आहे.
सनपुले येथील गावठाण या ठिकाणी श्री शिवाजी पाटील यांच्या प्लॉट असून त्यात एक चिंचेचं झाड आहे त्यावरून आज बुधवार (9 मार्च) सकाळी 6 वाजताच्या सुमारास एका माकडाचा पडून मृत्यू झाला. यासंदर्भात वनधिकारी यांना बोलावून पंचनामा करण्यात आले. पंचनामा करतांना पोलीस पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य व सर्व गावातील नागरीक उपस्थित होते. नंतर गावकरी यांनी त्या मृत माकडाला गावात आणले. त्यानंतर धार्मिक रिवाजानुसार त्याची पूजादेखील करण्यात आली. त्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली.
ही अंत्ययात्रा गावातील तापी काठी स्मशान भूमी जवड असलेल्या शेतात येऊन थांबली. तिथे मोठा खड्डा खणण्यात आला होता. या खड्ड्यात रितीरिवाजानुसार माकडाचे अंत्यविधी करण्यात आले. गावखेड्यात आजही माकडाला मारुतीचे रुप समजले जाते, त्याचे हे जिवंत उदाहरण मानावे लागले.