महाराष्ट्र
भुसावळ शहरात अजान माईक वर न होता साधेपणाने होईल : डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे

भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) शहरातील सर्व मज्जितचे ट्रस्टी,सर्व मौलवी व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची यांची रमजानच्या पार्श्वभूमीवर एक बैठक पोलीस प्रशासनाकडून आयोजित करण्यात आली होती. त्याच प्रमाणे लाऊड स्पीकरचे सध्या स्थितीत जे काही निर्देश आहे त्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली.सर्व शहरातील मुस्लिम नागरिक,मौलवी यांनी मान्य केले.
आज पासून होणारी अजान माईक वर न होता साधेपणाने होईल व सुप्रीम कोर्टाच्या सन २००५ चे जजमेंटनुसार त्याचे भुसावळ शहरांमध्ये शब्द शहा पालन केले जाईल अशी खात्री,व आश्वासन भुसावळ शहरातील जबाबदार नागरिकांनी दिले आहे. याबद्दल पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी अभिनंदन केले व सुप्रीम कोर्टाचे नियमांचे भुसावळ शहरात तंतोतंत पालन केले जाईल अशी ग्वाही दिली.