वरूड येथे ‘ऑफ्रोह’तर्फे 24 एप्रिल रोजी आदिवासी एकता परिषद
आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते उद्घाटन ; आ.वानखेडे प्रमुख पाहुणे

वरुड (रूपेश वानखडे) राज्यातील 33 अनुसूचित जमातीच्या जमात बांधव, तरूण- तरूणी, अधिकारी कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी ऑर्गनायझेशन फाॅर राईटस ऑफ ह्युमन शाखा-अमरावतीच्या वतीने 24 एप्रिल 2022 रोजी स.11 वा. वरूड येथील गजानन महाराज मंदिर सभागृह येथे ‘आदिवासी एकता परिषदे’चे आयोजन केले आहे, अशी माहिती व ऑफ्रोहचे मिडीया प्रमुख ललीत नंदनवार यांनी दिली.
या परिषेचे उद्घाटन वरूड- मोर्शी चे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात येणार असून ‘ऑफ्रोह’चे अमरावती जिल्हाध्यक्ष यशवंत वरूडकर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषवणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बळवंतराव वानखेडे, ऑफ्रोहचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर, कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, अमरावती जिल्हा युवा सेना प्रमुख धिरज खोडस्कर, ऑफ्रोहचे उपाध्यक्ष देवराव नंदनवार, महासचिव रूपेश पाल, कोषाध्यक्ष मनष पंचगाम, सहसचिव डाॅ.अनंत पाटील, महिला आघाडीच्या राजयाध्यक्ष अनघा वैद्य, सचिव निता सोमवंशी, ऑफ्रोह चे मार्गदर्शक डाॅ.दिपक केदार, कायदेशीर सल्लागार अँड.अनिलकुमार ढोले, नरेंद्र ढोलवडे,निलिमाताई केदार, मोहन नायडू, राजूभाऊ जुवार, राम पिजरकर, राजेंद्र काळमेघ, सन्नी चौहान, प्रफुल्ल महाजन, मंगेश गजभे इत्यादि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावे, जात प्रमाणपत्र पडताळणी चा 2000 चा ‘काळा’ कायदा रद्द करावा, आदिवासींच्या सर्व योजनाचा लाभ मिळावा, अप्पर आदिवासी आयुक्त विरुद्ध माधुरी पाटीलमध्ये दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जात प्रमाणपत्र तपासणी समितीची रचना करावी व अवैध केलेले जात- प्रमाणपत्र पुन्हा तपासून ‘वैधता’ द्यावी या व इतर मागण्यांसाठी सदर परिषदेचे आयोजन केले आहे. 33 आदिवासी जमातीची शक्ती एकवटण्यासाठी या आदिवासी एकता परिषदेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अमरावती जिल्हा व मोर्शी वरूड तालुका ऑफ्रोहच्या वतीने करण्यात आले आहे.