यवतमाळ जिल्ह्यातील ऑनलाइन सेवा केंद्रात लागणार आता दरपत्रक
माहीती अधिकार कार्यकर्ता कपिल घावडे यांच्या प्रयत्नांना यश
बाभूळगाव (ईश्वर देऊळकर) जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा व आपले सरकार सेवा केंद्रातील ऑनलाइन सेवा केंद्र नागरिकांच्या सेवेसाठी शासनाने उपलब्ध करून देण्यात आले आहे. यानुसार सेवा केंद्रांनी ठरवून दिलेल्या दरानुसार प्रत्येक दाखल्याचे पैसे नागरिकांकडून घेऊन महा ई-सेवा व आपले सरकार केंद्रामधील आहेत. ऑनलाइन सेवा केंद्रातून दाखले दिल्या जातात. मात्र जिह्यातील महा ई-सेवा व आपले सरकार केंद्रामध्ये ऑनलाइन सेवा केंद्राचे बॅनर व दरपत्रक लावलेले नसल्याने नागरिकांकडून अवाजवी पैसे काही ठिकाणी आकारल्या जातात. बाभूळगाव तालुका माहिती अधिकार महासंघ कार्यकर्ता कपिल घावडे (तालुका संघटक) यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्याकडे महा ई-सेवा व आपले सरकार सेवा केंद्रामधील ऑनलाइन सेवा केंद्रात बॅनर व रेट बोर्ड लावण्याबाबत ऑनलाइन तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवर कार्यवाही करताना नुकतेच जिल्हाधिकारी यांनी तहसील,ग्रामपंचायतमधील व इतर सेवा केंद्रा मधील ऑनलाइन सेवा केंद्रात रेट बोर्ड व बॅनर लावण्याबाबत निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविलेल्या पत्रासोबत बॅनर व दरपत्रकाचा नमुनाही दिला आहे. जिल्ह्यातील महा ई-सेवा व आपले सरकार केंद्रामध्ये अव्वाच्या सव्वा दर घेऊन नागरिकांची लूट केली जात होती. काम असल्याने लोकंही न बोलताच पैसे देऊन काम करून घ्यायचे. ही बाब माहिती अधिकार कार्यकर्ता घावडे यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीला गंभीरतेने घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने सदर निर्देश दिले आहे. सदर बॅनर व दरपत्रक तयार करून आपले महा ई-सेवा केंद्राच्या बाहेर दर्शनी भागावर लावण्यात यावे. बॅनर व रेट बोर्ड सात दिवसाचे आत तयार करून लावण्यात यावे. अन्यथा नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. बॅनर व रेट बोर्डचा नमुना जिल्हा समन्वयक महाऑनलाइन यांना ही देण्यात आला आहे.