मेळघाटच्या कुपोषण नियंत्रणासाठी ७२ पथके ; जिल्हा परिषदेतर्फे नियोजन
मेळघाट (योगेंद्र कासदेकर) : आशासेविका, अंगणवाडी सेविकांचा समावेश राहील. या चमू अंगणवाडीमध्ये जाऊन बालकांचे वजन घेणे नंतर त्या बालकाचे ग्रेडेशन ठरवून सॅम व मॅम बालकांचे संनियंत्रण करणे तथा आवश्यक ती उपचार पद्धती राबवणे आदी कामांचा समावेश आहे.
अंगणवाडी सभेला उपमुख्य कार्यकारी महिला व बालविकास कैलास घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख आयुक्त कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी काळे, गटविकास अधिकारी जयंत बाबरे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर, हिवताप आरोग्य अधिकारी डॉ. जोगी, तालुका आरोग्य अधिकारी प्रधान व श्रीमती वानखडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश प्रधान (चिखलदरा) व तिलोत्तमा वानखडे (धारणी), विस्तार अधिकारी मनोहर अभ्यंकर, साथरोग विषयक माहितीचे संकलक बाबुलाल शिरसाठ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे आदी अधिकारी उपस्थित होते. इतर योजनांच्या लाभासाठीही मार्गदर्शन: आरोग्य विषयक योजनांच्या लाभाची माहिती देऊन त्यासाठी योग्य प्रत्येक पथक वैद्यकीय अधिकारी, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कागदपत्रांची पूर्तता कशी करावी, याबाबत धारणी (महाराष्ट्र दस्तक) मेळघाटच्या कुपोषण नियंत्रणासाठी ७२ पथके कुपोषण नियंत्रित करण्यासाठी जिल्हा परिषदेने तब्बल ७२ स्वतंत्र पथके तयार केल्या आहेत. हे सर्व पथके पावसाळ्यापूर्वीच त्या भागातील जबाबदारी सांभाळतील, असे प्रशासनाचे नियोजन आहे.
जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली धारणी येथे नुकतीच एक सभा पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. आरोग्य व तत्सम यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते. मेळघाटमध्ये दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे झोन कार्यक्रमास सुरुवात केली जाते. आरोग्य आणि तत्सम यंत्रणेला कार्यप्रवण करण्यासोबतच पावसाळ्याच्या दिवसांत आदिवासींना योग्य सेवा दिली जावी, हा त्यामागचा उद्देश आहे. त्यानुसार आगामी २९ एप्रिलपर्यंत सर्व बातीची आखणी व पूर्वतयारी केली जावी, असे निर्देश पंडा यांनी दिले आहेत. या काळातच या ७२ पथकांचे गठनही केले जाईल. यावेळी सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशासेविका यांना मार्गदर्शन करण्यात आले.