मलकापूर तालुक्यात एक जि. प. सर्कल व दोन पं. स. गण वाढणार !
मलकापूर (करण झनके) ८ पंचायत समिती गण अस्तित्वात येणार आहेत. या होणाऱ्या फेरबदलामुळे जिल्हा परिषद सर्कलमध्ये बदल होऊन गणामधील गावांची सुद्धा विभागणी यामध्ये होणार असून, या बदलामुळे मलकापूर तालुक्यातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत, असे ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या आधारावर आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मलकापूर तालुक्यात एक जिल्हा परिषद सर्कल व दोन पंचायत समिती गट गणाची वाढ होण्याची विश्वसनीय माहिती आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिसते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्यामध्ये महानगर पालिका, नगर परिषद व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षणाचा प्रश्नसुद्धा न्यायप्रविष्ट असल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना, मतदारांची वाढ व मयत मतदारांची नावे कमी करणे यासह निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून या बाबी पुर्ण कराव्या लागतात. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे महानगर पालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीपुर्वीची तयारी विविध कारणास्तव किंवा महाविकास आघाडीमध्ये एकमत होत नसल्याने वेळोवेळी निर्णय बदल होत आहेत.
आज रोजी मलकापूर तालुक्यामध्ये ३ जिल्हा परिषद सर्कल असून, ६ पंचायत समिती गण आहेत. मलकापूर तालुक्यातील एक जिल्हा परिषद सर्कल व दोन पंचायत समिती गट-गण वाढविण्याबाबतच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या असून त्याबाबतचा प्रस्तावसुद्धा तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे. तालुक्यांमध्ये नवीन निर्मित गट- गणामुळे ४ जिल्हा परिषद सर्कल, तर तालुक्यात सद्यस्थितीत नरवेल धरणगाव, देवधाबा-वाकोडी व दाताळा- उमाळी असे तीन जिल्हा परिषद गट असून, या गटांतर्गत नरवेल, धरणगाव, देवधाबा, वाकोडी, दाताळा व उमाळी असे सहा गण अस्तित्वात आहेत. त्यामुळे प्रस्तावित असलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास मलकापूर तालुक्यात जांबुळधाबा वाकोडी मलकापूर ग्रामीण या नवीन जिल्हा परिषद गटाची, तर जांदुळधाबा व वाकोडी मलकापूर ग्रामीण या दोन नवीन पंचायत समिती गणाची नव्याने निर्मिती होऊ शकते. तसेच या बदलामुळे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या नरवेल धरणगाव गटाऐवजी नरवेल – वडोदा, तर देवधाबा- वाकोडी ऐवजी धरणगाव देवधाबा अशी पुनर्रचना होऊन दाताळा- उमाळी गट जैसे थे ठेवल्या जाऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
नवनिर्मित गट-गणामुळे इतर तीन जि.प. गट व सहा पं. स. गणातील गावांची विभागणी होऊन अस्तित्वात असलेल्या व नवीन पद्धतीने रचना करण्यात आलेल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील गावांची विभागणी होणार आहे.