महाराष्ट्र
मलकापूर बाजार समितीत शेतकरी व सैनिकांचा सत्कार
मलकापूर (करण झनके) मलकापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जय जवान जय किसानचा नारा देत सेवानिवृत्त सैनिक व शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच खरेदी-विक्री संघामार्फत गुरुवारी तूर खरेदी सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या तुरीच्या काट्याचे पूजन करुन तूर विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ. अरविंद कोलते, ॲड. साहेबराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण खपोटे, राजू पाटील, डॉ. अनिल खर्चे, ज्ञानदेव हिवाळे, समाधान इंगळे आदी उपस्थित होते. शिराढोण येथील भारतीय सूरज रवींद्र पाटील सेना दलामधून सेवानिवृत्त झाले. देशसेवा केल्याबद्दल त्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.