अज्ञात व्यक्तीने तुरीच्या सुड्या पेटवून दिल्याने नरवेल येथील शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
मलकापूर (करण झनके) मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील भाग २ शिवारामध्ये शेतकऱ्याच्या सहा एकरातील जमा करून ठेवलेल्या तुरीच्या दोन सुड्यांना रात्री नऊ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने नरवेल शिवारातील शेतकयांमध्ये भितीचे वातावरण असून एकच खळबळ उडाली.
सविस्तर वृत्त असे की, नरवेल येथील भाग दोन शिवारातील रात्री नऊ वाजेच्या दरम्यान जंगलात खूप मोठा आगेचा डोंब उजेड दिसत असल्याने सर्वच नरवेल, म्हैसवाडी गावातील शेतकरी हे त्या दिशेने पहात होते. तसेच पोलीस पाटील योगेश पाटील यांनी सुद्धा या आगीबद्दल चौकशी करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला नरवेल गावातील शेतकरी व पोलीस पाटला त्या आगीच्या उजेडाच्या दिशेने शेतात गेले असता विनोद कृष्णाजी कोलते नरवेल भाग -२ यांची नऊ कोलते नरवेल भाग – २ यांची नऊ एकरातील दोन सुड्यांना अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याचे लक्षात पसरले आले शेतकऱ्यांना जवळपास ७० ते ७२ तुरीचे पोते उत्पन्न होणार होते त्यानुसार जवळपास अंदाजे किंमत त्यानुसार जवळपास चार ते पाच लाखापर्यंत शेतकर्याचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. गावातील काही प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पाटील हे शेतात पोहोचेपर्यंत तुरीच्या दोन्ही सुड्या या पूर्णपणे जळून खाक झालेल्या होत्या, तिथूनच पोलीस पाटील योगेश पाटील यांनी तहसीलदार, ग्रामीण पोलीस स्टेशन दसरखेड, तलाठी यांना फोन द्वारे कळून माहिती सुद्धा दिली तसेच शेतकरी विनोद कृष्णा कोलते हे पत्नीसह तसेच सोबत गावातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव कोलते पोलीस पाटील यांच्यासह दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे या घटनेबद्दल तक्रार सुद्धा देण्यात आली आहे.
या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांना आता खूप चिंता सतावत आहे कारण त्यांनी जमिनीची नांगरटि वखरणी केल्यापासून पेरणी करून त्यापिकाचे संगोपन करून त्यावर खर्च करून आता तोंडी आलेला घास हा अज्ञात व्यक्ती द्वेष भावनेमधून हिरावला आहे. अशा प्रकारचे कृत्य करायला लागल्या मुळे शेतकऱ्यांच्या खूप जीवावर बेतले असून या कृत्याला आळा घालण्याकरता शासन प्रशासन स्तरावरून प्रयत्न करण्यात यावे तसेच असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारची सुद्धा मागणी आता शेतकरी वर्गामधून होत आहे.