वैजापूर येथील क्षेत्र बोरसर येथे म्हसोबा यात्रेला प्रारंभ
बोरसर : वैजापूर येथील क्षेत्र बोरसर येथे कोरोनानंतर यावर्षी म्हसोबा यात्रेला प्रारंभ झाला. बोरसर येथे साला प्रमाणे परंपरा पद्धतीने बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले व फटाके फोडून मोठ्या स्वरूपाने जल्लोष करण्यात आला. तसेच सैलानी बाबा संदल यात्रा काढण्यात आली होती. बोरसर गावामध्ये दोन वर्षानंतर यात्रेला प्रारंभ झाला आहे.
गावातील मोठ्या संख्येने उत्साहाने भाविकांनी गर्दी केली होती. यात्रा कमिटीचे अध्यक्ष मजारी पवार, संतोष जाधव, अण्णा पवार, कांतीलाल पवार, भैय्या पवार, सोपान पवार, अशोक बाळू पवार, बापू पवार, कैलास पवार, जनार्दन पवार, गोटू अण्णा, अशोक आप्पा, संजय कानाडे, अशोक पाटील पवार, दादाभाऊ पवार, दादा गावांतील ग्रामपंचायतचे गोरे, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व गावातील नागरिकांनी मंदिर परिसरात यात्रेला जागां उपलब्ध करून दिली व यात्रेसाठी आलेल्या दुकानासाठीही जागेची व्यवस्था करून दिली होती व यावेळी येणाऱ्या भाविकांचे मोठ्या स्वागत करण्यात आले.