महाराष्ट्र
नविन नाशिक ब्लॉक काँग्रेसतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नाशिक (मनोज साठे) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पवन नगर येथे सिडको ब्लॉक काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यात आले.
युवक नेते भरत पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल माहिती दिली, तसेच संविधान वाचवण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यासाठी या पवित्र दिनी आपण सर्वांनी आपली सामाजिक, राजकीय जबाबदारी योग्य रीतीने पार करावी असे आव्हान करण्यात आले. ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील यांनी हार घालून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे आयोजन युवक महासचिव नितेश निकम, सचिनभाऊ गायकवाड, इम्रान अन्सारी, शुभम अलई यांनी केले होते.