डॉ. बाबासाहेबांनी विद्या व्रताचा वसा आयुष्यभर जपला : व्ही.जी. भालेराव
महात्मा फुले शिक्षण संस्थेत तायक्वांदो खेळाडूंचा सन्मान
पहूर, ता. जामनेर (ईश्वर चौधरी) डॉ. बाबासाहेब आजन्म जन्म विद्यार्थी होते. त्यांनी विद्या व्रताचा वसा आयुष्यभर जपला, हाच वसा विद्यार्थ्यांनी जोपासला पाहिजे असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही.जी.भालेराव यांनी केले. महात्मा फुले शिक्षण संस्थेत आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आजचा विद्यार्थी ‘या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक, डॉ. हेडगेवार प्राथमिक विद्यालय आणि शौर्य स्पोर्ट्स अॅकडमी पहूर आयोजित तायक्वांदो खेळाडूंचा यावेळी प्रमाणपत्र व बेल्ट प्रदान करून गौरव करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान महावीर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीमहात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे होते. प्रमुख अतिथी म्हणून श्रीकृष्ण चौधरी, तुकाराम जाधव, डॉ. प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय देशमुख यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापिका व्ही.व्ही. घोंगडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांचा समतेचे शिलेदार पुस्तक भेट देवून सत्कार करण्यात आला. यावेळी ३२ प्रशिक्षणार्थ्यांना तायक्वांदो क्रीडा प्रकारातील उज्वल यशाबद्दल प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे यांनी सूत्रसंचालन केले. तायक्वांदो प्रशिक्षक हरीभाऊ राऊत यांनी आभार मानले. याप्रसंगी के.ए. बनकर, ए.एम. क्षीरसागर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रकाश जोशी, अनिल पवार, संजय बनसोडे यांनी सहकार्य केले.
यांचा झाला सन्मान
येलो बेल्ट करण लहासे, भावेश महाजन, चैतन्या पवार, विमर्ष पवार ; ग्रीन बेल्ट मोहिनी राऊत, पलक जोशी, दिव्या जोशी, वृषाली पवार, श्रावणी लोहार, दिपाली भिवसने, तृप्ती घोंगडे, आकांक्षा जाधव, निकिता घोंगडे, कांचन घोंगडे, वैष्णवी घोंगडे, वैष्णवी सोनवणे, नंदिनी सोनवणे, गौरी कुमावत, कुश उबाळे, रुद्र उबाळे, यश राऊत, कुंदन कुमावत, देवेश सोनवणे, सतिष क्षिरसागर, हितेश पवार, वेदांत क्षिरसागर, हर्षल उदमले, सुमित चौधरी, आशिष लोहार, अजय घोंगडे, दिनेश राऊत, यश कुमावत.