म्हात्रे स्पोर्टस ॲकडमीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संविधान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
दिवा (सचिन शेलवले) शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचलित, श्री गणेश विद्या मंदिर दातिवली प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग, माय मदर इंग्लिश स्कुल तसेच जिजाऊ बाल संस्कार केंद्र या संस्थेतील सभागृहा मध्ये म्हात्रे स्पोर्टस ॲकडमीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त संविधान जन जागृती कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
त्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते Adv. प्रज्ञेश सोनावणे हे प्रमुख पाहूणे होते. त्याच बरोबर ग्रंथालचाचे उद्घाटन या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा लिलावती म्हात्रे तसेच संस्थेचे पदाधिकारी शिवदत्त म्हात्रे, साईनाथ म्हात्रे, दिनेश म्हात्रे, केतकी म्हात्रे तसेच गिता म्हात्रे या उपस्थित होत्या. तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यामिक, माय मदर इंग्लिश स्कुल तसेच बाल संस्कार केंद्राचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजनाने तसेच सरस्वती मातेच्या प्रतिमेच्या पुजनाने झाली. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे सचिव साईनाथ म्हात्रे म्हणाले की आपल्या दिवा भागात आपल्या शाळेत भव्य दिव्य ग्रंथालय व्हावे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करून ही जयंती पुढल्या वर्षी मोठ्या संख्येने मोकळ्या मैदानात साजरी करू असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व वक्ते Adv. प्रज्ञेश सोनावणे यांनी संविधान जनजागृती या कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली. संविधान जनजागृती करणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. ते आपणाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाले. पहिले शिवचरित्र म. ज्योतिबा फुलेंनी लिहले. आपली लढाई सत्ता आणि संपत्ती साठी नसुन स्वाभिमानासाठी आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.
भारताच्या राज्यघटनेत ३९५ कलमे ८ परिशिष्ट व २२ भागांची मिळून राज्यघटना तयार करून संसदीय लोकशाही अमलात आणली. हिंदुकोड बील व ओबीसींना आरक्षण मिळत नाही. म्हणुन 1951 ला मंत्री मंडळातून स्वत : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. 1902 मध्ये छत्रपती शाहु महाराजांच्या काळात बहुजणांना आरक्षण देण्यात येत होते. सर्व महापुरुष हे बाप आहेत. त्याच्या विचारांचा तसेच तत्वांचा अभ्यास करून समाजाने त्यांच्या विचार सरणी नुसार चाळले पाहिजे. ती प्रत्यक्षात अमलात आणली पाहिजेत. असे त्यांनी भाषणात समारोपाच्या वेळी सांगितले.