महाराष्ट्र

बोरद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

बोरद (योगेश गोसावी) तळोदा तालुक्यातील बोरद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. प्रारंभी सामूहिक अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले तसेच त्यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की गेल्या दोन वर्षांनंतर आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करीत आहोत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्यांनी लिहलेल्या राज्यघटनेमुळे प्रत्येक समाजाला हक्क प्राप्त झाला. त्यामुळे आपण आपल्या हक्कासाठी लढू शकतो आपले हक्क मिळवू शकतो.

यावेळी शहादा तळोदा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनीही मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी तळोदा न.पा बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय,संदीप परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे, पुंडलिक राजपुत, तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर समिती बोरदचे अध्यक्ष रतीलाल मोहिते, उपाध्यक्ष आकाश कुवर तसेच भीम योद्धा बी बॉईज ग्रुप बोरद चे गणेश भामरे, रतीलाल बागुल,मिलिंद ढोडरे, कन्हैयालाल ढोडरे,दीपक ढोडरे,सुनील भामरे,कुणाल पाडवी, तळोदा प. स समितीचे सदस्य विजयसिंह राणा,मंगलसिंग चव्हाण,दयानंद चव्हाण,पोलीस पाटील भावराव ढोडरे,मनीषा पाटील,मंगेश पाटील, माजी सरपंच वासंतीबाई ठाकरे,नरहर ठाकरे यावेळी पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा, बोरद दूरक्षेत्राचे हवालदार गौतम बोराळे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे