महाराष्ट्र
पंचायत समिती मंगळवेढा यांचा दशवार्षीक नियोजन आराखडा व प्रशिक्षण ग्रामपंचायत गोणेवाडी येथे आयोजित
मंगळवेढा : महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समिती मंगळवेढा यांचा दशवार्षीक नियोजन आराखडा व प्रशिक्षण ग्रामपंचायत गोणेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंगळवेढा पंचायत समितीचे विविध विभागाचे अधिकारी याठिकाणी उपस्थित होते.
लोकानभिमुख कामांची व शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रशासकीय अधिकारी यांनी दिली. आलेल्या सर्व अधिकारी वर्ग व सामाजिक राजकीय मान्यावरांचे सत्कार व स्वागत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मा.जिल्हाध्यक्ष गोणेवाडीचे सरपंच रामेश्वर मासाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला.