वरवंड मध्ये वृक्षरोपणद्वारे जपल्या स्मृती
वरवंड ता (दौंड) : ह.भ.प.सूर्यकांत दिवेकर यांना काही दिवसांपूर्वी देवाज्ञा झाली.आपलं सामाजिक जीवन व्यथित करत असताना नेहमी मदतीची सहकार्य करण्याची भूमिका ठेवत असे. आपल्या जीवनात अनेकांचे संसार उभारणीस आणले होते. प्रत्येक वेळी पुढाकार घेवून संपूर्ण जबाबदारी ने त्यांचे कार्य करत असत त्यांचं काम एखाद्या झाडाच्या सावली सारखे होतं म्हणून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्याकाने त्यांनी दिलेली शिकवण आत्मसात करण्याचं ठरवलं आहे. त्याचच एक उदाहरण म्हणून त्यांच्या तेराव्या च्या विधी निमित्ताने आठवणीत आज वृक्षरोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांची आठवण पिढ्या पिढ्या जपली जाईल. आपण केलेलं कार्य शिकवण नेहमीच कार्यरत ठेवण्याचा प्रयत्न करू. वरवंड मध्ये वृक्षरोपणा द्वारे स्मृती जपल्या.
त्यांच्या स्मृती जपण्यासाठी दिवेकर परिवारातर्फे वरवंड येथील नवीन विठ्ठल रुक्माई मंदिर पालखी तळ परिसरांमध्ये वृक्षारोपण केले. त्याचबरोबर या वृक्षाचे योग्य प्रकारे संगोपन होण्यासाठी त्याला पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच त्या निसर्गप्रेमी वृक्ष मित्र माजी सरपंच संतोष कचरे, दिपक बारवकर, युवा उद्योजक सागर दिवेकर, प्रदीप दिवेकर, सकाळ मधील सॉफ्टवेअर डेव्हलपर सागर दिवेकर, भाजपचे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सचिन दिवेकर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जगदाळे, वैभव दिवेकर, किरण देशमुख, वैभव भोसले, समीर दिवेकर, विठ्ठल दिवेकर या वेळी उपस्थित होते.