ऐचाळे-दिवंगत सरपंच कै.मंगा मोठा भाऊ बागले यांच्या २५ व्या स्मृतीदिनानिमित्त दिला आठवणींना उजाळा
ऐचाळे : येथील प्रतिष्ठित शेतकरी व माजी सरपंच कै.मंगा मोठा भाऊ बागले यांच्या २५ व्या स्मृतीदिनानिमित्त शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त वस्तूंचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
कै.मंगा मोठा भाऊ बागले यांचे कार्यकर्तृत्व आणि व्यक्तीमत्त्व म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणारे मोठा भाऊ लोकांच्या सुखदुःखात नेहमी अग्रेसर असत सरपंच असताना गावात एकोपा,शांती आणि स्थिरता ठेवण्याचे काम त्यांनी त्यांच्या काळात केले.गोरगरीबांवर अन्याय होत असेल तर मोठा भाऊंनी नेहमी योग्य न्यायनिवाडा केला. असे मोठे मनाचे मोठा भाऊंच्या २५ व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे नातु चि.निखिल अधिकार बागले यांनी शेतकऱ्यांना ताडपत्री, PVC पाईप, स्प्रे-पंप, मोटर साहित्य ५०% अनुदानावर वाटप करुन अनोखी श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते, साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा धुळे,नंदुरबार, जळगाव बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक पोपटरावजी सोनवणे, आदर्श शिक्षक रामचंद्र भलकारे, इंदवे येथील सोनवणे, युवा नेते भैय्यासाहेब शिंदे, धनगर समाजाचे जेष्ठ नेते भगवान आण्णा पेंढारे, रामा बापु लांडगे जेष्ठ नेते शामराव तात्या साबळे, लोटन आबा कंखर, महिपत आप्पा मराठे, विष्णा दादा मराठे, दंगल नाना बोरसे, खुशाल बापू पेंढारे, विश्वास नाना पेंढारे, मगन आप्पा महाले, रावण दादा साबळे, ग्रा.पं.स. राजेश दादा साबळे, ग्रा.पं.स. दादाभाई शेलार, ग्रा.पं.स. नाना दादा जाधव, संजय मामा पेंढारे, तुषार शेलार, ब्रिजलाल शेलार, भटु आण्णा साबळे, राजु बागले, पंडित आबा बोरसे, प्रकाश अडगळे, रमेश अडगळे, डॉ.भिमराव पेंढारे, बापु पेंढारे, धनराज पेंढारे, दलाल बापु बागले, आबा अडगळे, दिलीप पाटील, रघुनाथ पाटील, खुशाल पाटील, बाबुराव पाटील, योगेश शेलार, भाऊसाहेब मराठे, भाऊसाहेब पाटील, बाबुराव साबळे, नाना शेलार, विलास शेलार, निंबा नाना पाटील, रमेश बापू सैंदाणे, भगवान लांडगे, भारत भामरे घोटाणेकर, युवा मित्र परिवार घनश्याम पेंढारे, नितीन शेलार, दिपक मराठे, सुदाम मुजगे (प्राथमिक शिक्षक), सोपान भदाणे, भुषण पेंढारे, योगेश बागले, सोपान बागले, किरण सोनवणे (पोलिस), महेश पेंढारे, चेतन पेंढारे, सोपान बागले, जितु बागले, सोपान साबळे, ज्ञानेश्वर साबळे, नितीन अडगळे, संदिप पेंढारे, भैय्या पेंढारे, गोलु पाटील, भाऊसाहेब शेलार, शंकर गवळे, दादा शेलार, मनोज मराठे, बंटी साबळे, महेश शेलार, गोठु मराठे, योगेश बोरसे, गणेश पाटील, ज्ञानेश्वर भदाणे आदी तरुण मित्र उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशाल बापु अडगळे (माध्य.शिक्षक साक्री) आणि सदर कार्यक्रमाचे आयोजन कै.मंगा मोठा भाऊ बागले यांचे जेष्ठ सुपुत्र अधिकार मंगा बागले व नातु चि.निखिल अधिकार बागले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी साक्री यांनी केले होते.