मोहोळ तालुक्यासाठी जलसंपदा विभागाकडून १२० कोटीचा निधी मंजूर
सोलापूर (वैजीनाथ धेडे) मोहोळ तालुक्यासाठी जलसंपदा विभागाकडून १२० कोटीचा निधी मंजूर झाला आहे. तसेच आष्टी व शिरापुर उपसा सिंचन योजनेसाठी ९० कोटी तर उजनी डावा कालवा दुरूस्ती साठी ३० कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार यशवंत(तात्या)माने यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या विशेष सहकार्याने व राजन पाटील व जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष बळीराम(काका)साठे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच झालेल्या अर्थसंकल्प(बजेट)२०२२- २०२३ मध्ये जलसंपदा विभागाकडून मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजने करिता ६० कोटी व शिरापुर उपसा सिंचन योजनेकरिता ३० कोटीचा तसेच उजनी डावा कालव्यावरील कारंबा, मोहोळ, कुरुल व बेगमपुर येथील कालवा दुरुस्तीसाठी ३० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती आमदार यशवंत(तात्या)माने यांनी दिली आहे.