गिरीश महाजनांवर मोका लावण्याचा कट रचणाऱ्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे ; भाजपाचे वरणगावात रस्ता रोको
घोषणांनी परिसर दणाणून सोडला ; सीबीआय चौकशी झालीच पाहिजे
वरणगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून मोका हा लावण्याचा कॉटर असणारे सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांच्यासह जे महाविकास आघाडीचे नेते असतील त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टी वरणगाव शहराच्या वतीने वरणगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच पोलीस स्टेशन येथे एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रवीण चव्हाण मुर्दाबाद, महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, गिरीश भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी बस स्टॅन्ड दणाणून गेले. आजच्या या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजयुमोचे शहराध्यक्ष आकाश निमकर, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रणिता चौधरी पाटील, तालुकाध्यक्ष मनीषा पाटील, माजी ग्राप सदस्य रुख्मिनी काळे, माजी सरपंच सुभाष धनगर, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट ए जी जंजाळे, मिलिंद भैसे, डॉ सादिक किसान मोर्चा चे ऋषिकेश महाजन, रमेश पालवे, गजानन वंजारी, अरुण बावणे, डॉक्टर नाना चांदणे, संदीप माळी, पप्पू ठाकरे, डिके खाटीक, मुस्लिम अन्सारी, कमलाकर मराठे, हितेश चौधरी, नटराज चौधरी, गोलू राणे, अंकुश साबळे, पिंकेश घाटोळे, अनिल वंजारी, बाळा धनगर, अरुण बावणे, शेख, राहुल जंजाळे, कुंदन माळी, उषा पवार, भाग्याश्री पाटील यांच्यासह असंख्य नागरिक महिला उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन यामध्ये जे जे महाविकास आघाडीचे नेते सहभागी असतील त्यांना अटक करून संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजेत, अन्यथा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करणार असा इशारा यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला.