महाराष्ट्र
तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक
ढाणकी (निलेश जाधव) तलवार घेऊन फिरणाऱ्या एका युवकाला बिटरगाव पोलिसांनी आज अटक केली आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अकोली फाट्या जवळ एक मुलगा वय अंदाजे 20 ते 22 वर्षे तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने आकोली फाटा गाठत त्या तरुणाला अटक केली. सदर तरुणाचे नाव सुरत सुनील हनवते असून तो अकोली येथील रहिवासी आहे. तेच्याकडे असलेल्या पोत्यामध्ये तलवार आढळून आली. सदर आरोपीविरुद्ध अप न. 105/2022 कलम 4/25 आर्म ऍक्ट नुसार गुन्हा नोद करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रताप बोस यांच्या मार्गदर्शनात मपोना विद्या राठोड ह्या करत आहे.




