महाराष्ट्र
मक्रणपुर गावामध्ये गेल्या १४ महिन्यांमध्ये विकासकामे प्रगती पथावर सुरू
वैजापूर : मक्रणपुरमध्ये दि. २७ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ठिक १० वाजता वार्ड क्र ०३ मध्ये सिमेंट काँक्रीट रोडचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी सर्व ग्रामस्त मंडळी व सरपंच सना अस्लम शेख, उपसरपंच विनायक सोनवणे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र पगारे, तंटा मुक्ती अध्यक्ष तय्यब शहा तसेच सदस्य हिराबाई नागरे, बाबा मलिक शूख, शामगीर गोसावी, सुभान पटेल, दिपक सातदिवे, तुकाराम सोनवणे, आशोक साठे बाबुराव शेजवळ, दत्तु वने, गफुर शेख व ग्रामपंचायत कर्मचारी-संजय गायकवाड, रामनाथ काळे, आसिफ शेख अंगणवाडी कर्मचारी आशा सेविका, गावातील प्रतिष्टीत नागरिक मारोती मंदिरा जवळ उपस्थित होते. आमचे गावात सर्व नागरिक एकजुटीने राहतात विकास कामे अजून ही करणे आहे आणि नागरिकांसाठी शेवट पर्यंत मी कामे करत राहील, असे विनायक नाना सोनवणे यांनी सांगितले.