महाराष्ट्रराजकीय
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, कपड्यांवरील वाढलेला जीएसटी १ जानेवारीपासून कमी
नवी दिल्ली (प्रतिनिधी) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी कौन्सिलने कपड्यांवरील जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय आज मागे घेतला आहे. जीएसटी कौन्सिलने यापूर्वी कपड्यांवरील जीएसटी दर ५ टक्क्यांवरून ७ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक राज्ये आणि वस्त्रोद्योग संघटना हा निर्णय मागे घेण्याची मागणी करत होते.
जीएसटी मंडळ १ जानेवारी, २०२२ पासून, कापड उत्पादनांवर जीएसटी ५ टक्क्यांवरून १२ टक्के एवढी वाढ केली जाईल, असे निश्चित केले होते, पण राज्य सरकार आणि कापड उद्योग जीएसटी दर वाढीच्या विरोधात होते. त्यामुळे जीएसटी कौन्सिलच्या आजच्या बैठकीत कपड्यांवरील जीएसटी ५ टक्क्यांवरून १२ टक्के करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यावर चर्चा होऊन जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला.