चिमुकल्या बालिकेच्या निषेधार्थ शिंदखेडा येथील विश्वकर्मा सुतार समाजाच्यावतीने तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील श्री विश्वकर्मा सुतार समाज शैक्षणिक सेवा मंडळाच्या वतीने सातारा जिल्हयातील वाडी-रुवले येथील सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. सदर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी तालुकाध्यक्ष सुरेश अहिरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सात वर्षातील नासमज बालिकेवर अत्याचार व हत्या केली हा निंदनीय प्रकार आहे. सदर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. त्यासाठी फास्टट्रक कोर्टात चालवावी व शासनाने सदर खटला चालविण्यासाठी अॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी व बालिकेच्या कुटुंबातील सदस्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली.
यावेळी तालुका अध्यक्ष सुरेश अहिरे, उपाध्यक्ष खंडेराव मिस्तरी, सचिव गणेश मिस्तरी, हरिष मोरे, रमेश अहिरे, कैलास अहिरे, रवींद्र मिस्तरी, लोटन मिस्तरी, प्रकाश बोरसे, प्रदीप वाघ, योगेश सुर्यवंशी, विक्रम मिस्तरी, रवींद्र वाघ, मुकेश जाधव, शाम जाधव, योगेश जगन्नाथ सुर्यवंशी आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.