विवेक फाउंडेशन धाडरीचे उपक्रम ; हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन
धाडरी : भारत विकास परिषद धुळे, देवगिरी प्रांत व विवेक फाउंडेशन धाडरी यांच्या संयुक्त विद्यमाने धाडरी येथे शनिवार दि. ३० एप्रिल २०२२ रोजी रक्तगट व रक्ताचे प्रमाण (हिमोग्लोबिन) तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात वय 12 वर्षे व पुढील मुली व स्त्रियांची रक्त तपासणी केली जाईल. तसेच ज्यांचे रक्ताचे प्रमाण कमी असेल त्यांना तज्ञ डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाने 1 ते 3 महिन्याच्या गोळ्या मोफत देण्यात येतील.
ग्रामीण भागातील कष्टकरी व शेतकरी वर्ग मोठा आहे.कामाच्या घाईगडबडीत आरोग्याकडे स्त्रियांकडुन दुर्लक्ष होते.या वर्षी तर कडक उन्हाची तीव्रता लक्षात घेता हे शिबिर आयोजित केले आहे.तरी आपण आपल्या घरातील व परिसरातील माता भगिनींनी या शिबीराचा लाभ घ्यावा. या शिबिरात तज्ञ डाॅक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. रक्तगट व रक्ताचे प्रमाण (हिमोग्लोबिन) तपासणी फी फक्त 50रुपये ठेवण्यात आली आहे.
शिबीराचे ठिकाण
छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाडरी ता.जि.धुळे पिन.424006 वेळ.. सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत