अधिकाऱ्यांना हाताशी धरून होतोय वाळूउपसा

वैजापूर (गहिनीनाथ वाघ) भरदिवसा वैजापूर तालुक्यातील जळगाव येथे चालू असलेल्या वाळू उपसा कोण घालणार लगाम गावकऱ्यांचे म्हणणे सर्व अधिकाऱ्यांना हाताशी धरून म्हणतोय वाळूउपसाचा बेहिशोबी उपसा 1 ते 2 ब्रास ची पावती देऊन आठ ते दहा ब्रास वाळू उपसली जाते.
शासकीय नियमानुसार टेंडरमध्ये बोर्ड लावला जातो. किती ब्रास वाळू उपसा होणार याची माहिती दिली असते व वाळू कुठे उपसायची त्याची सीमा आखून दिलेली असते. पण, टेंडरमध्ये तसे कुठलाही प्रकार नाही व बेकायदेशीर सरसगट जेसीबी पोकलेन च्या साह्याने वाळू उपसा चालू आहे.
भागाठाण येथील सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष यांनी वैजापूर अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारची शासन दखल घेत नाही याचा अर्थ सर्व अधिकारी हात मिळवणी करून वाळू उपसा करत आहे. नदीपात्र मधून ओव्हरलोड गाड्या भरून जात आहे. दहा चाकी बारा चाकी सहा चाकी अशा अनेक प्रकारच्या गाड्या भरून जात आहे तरी याला जबाबदार कोण ? असे भागाठाण सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष बोलले.
दि. 17 मे 2022 रोजी मंडळ अधिकारी पूरी यांनी बेकायदेशीर ताबा दिल्यामुळे त्यांची चौकशी करायची असे लेखी दिले होते. तरीही यामध्ये अधिकारीच शामिल असल्यामुळे वाळू उपशाला कोणीही लगाम घालत नाही अधिकारी पूरी या नदीपात्रात असतानाही त्यांच्या पाठीमागे ओव्हरलोड गाड्या भरुन जात आहेत. ओवरलोड गाड्या भरून जात असल्यामुळे भागाठाण आगाठाण चिचखेडा या रस्त्याची अत्यंत दुर्दैवी अवस्था झाली आहे असे भागाठाणचे तंटामुक्त अध्यक्ष बोलले.