महाराष्ट्र
नाना पटोले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेसच्या वतीने रुग्णालय व गरजु लोकांना फळ, बिस्किट वाटप
सोनगीर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आक्रमक आणि अभ्यासू अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल असलेले रुग्णांना व गरीब लहान मुलांना केळी, सफ़रचंद, बिस्किट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सभापती प्रकाश पाटील, शिंदखेड़ा पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, शिंदखेड़ा युवक काँग्रेस अध्यक्ष विजेंद्र झालसे कलमाड़ी, व डॉक्टर शीतल शिंदे, डॉक्टर किरण कुमार नगराले, अधी परिचारक रोशन चव्हाण, मनीष बाविस्कर, कक्ष सेवक धनराज पिवाल, सुरक्षा रक्षक कैलास ठाकुर, वाहन चालक योगेश गुजर आदी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.