मालपूर येथे श्री गजानन महाराज मंदिराचेभुमी पूजन व वृक्षारोपण
मालपुर (प्रभाकर आडगाळे) मालपुर हे गाव संताची पावनभुमी मानली जाते. येथे अनेक देवदेवतांची व महापुरुषांचे मंदिरे व पुतळे आहेत. येथे व येथे नेहमीच भजन पुजन होत असतात चारही दिशांना मंदिरे आहेत. फक्त कमी होते ते श्री गजानन महाजांचे मंदिर. परंतु, आज श्री”च्याकृपेने ते देखील पुर्ण होत आहे. श्री गजानन महारांचे आज राज्यासह संपुर्ण भारतात १४४ वा प्रकट दिनांचे औचित्या साधुन गजानन महाराजांचे मंदिराचे भुमीपुजन महाविरसिंह रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी सरपंच मच्छिद्र शिंदे, जगदिश भावसार, राकेश पाटील, छगनबागुल, पोपट बागुल, विरेंद्र पवार, दिनेश धनगर, हिरामण धनगर, उत्तम भामरे, ह.भ.प. रामचंद्र महाराज, रमेश ठाकुर, सुनिल पाटील, रविंद्र रावल, भटु रावल, चंद्रसेन रावल,भुषण रावल, अशोक बागुल, पुरोहित किशोर पुराणिक, वेदाचार्य हर्षवर्धन पुराणिक, महेशकुमार शास्री, ग्रामपंचायत सदस्य अरुण धनगर आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रम नारायणसिंग नगरात मंदिराचे भुमीपुजन करण्यात आले.