शिंदखेडा येथे ‘रोटरी क्लब’मार्फत रक्तदान शिबिर ; ५० रक्तदात्यांनी केले रक्तदान
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा येथील रोटरी क्लबने दि २६ फेब्रुवारी ला रक्तदान शिबीर आयोजित केले होते त्यांत “रक्तदाता हा जीवनदाता असतो “या शीर्षकाखाली तालुकास्तरीय शिबिरात ५० निरोगी व्यक्तींनी रक्तदान केले.
या प्रोजेक्टचे चेअरमन हर्षल अहिरराव यांनी प्रास्ताविक करून रक्तदानाबद्दल सांगताना मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमधे शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.अशी उपयुक्त माहिती दिली.धुळे येथील नवजीवन ब्लड बँक प्रमुख डॉ सुनील चौधरी, रोहिदास जाधव, पांडुरंग गवळी, चंद्रकांत दंडगव्हाण , गजानन चौधरी, प्रवीण महाजन यांचे अमूल्य सहकार्य लाभले.
रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा गोपालसिंह परमार यांनी भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात येते. महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते. ब्लड बॅंकेच्या रेफ्रिजरेटरमध्ये रक्त ४-५ आठवड्यांपर्यंत रक्त सुरक्षित ठेवता येते असे सांगितले
यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात आला. याप्रसंगी रो. हर्षल अहिरराव, रो गोपालसिंग परमार, रो हितेंद्र जैन, रो विनोद जैन, रो बाळकृष्ण बोरसे, रो संजय पारख, रो परीक्षित देशमुख, रो संदीप गिरासे, रो देवेंद्र नाईक, रो संजयकुमार महाजन, रो भागचंद जैन, रो विक्की चंदनांनी, रो सुमित जैन, रो मयूर ओसवाल, रो डॉ विनय पवार, रो डॉ सुजय पवार यांनी अनमोल सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.