नवापूर येथील जुने महादेव मंदिराचे नूतनीकरण करून परिसर सुशोभित करणार ; आ. शिरीष नाईकांनी दिले आश्वासन
नवापूर (प्रतिनिधी) शहरातील रंगावली नदी किनारी जुने महादेव मंदिर अनेक वर्षांपासून स्थापित आहे. या मंदिराचे नूतनीकरण करत आजुबाजुचा परिसर सुशोभित करण्यासाठी आमदार निधीतून मंजुरी देण्याचा आश्वासन नवापुर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी या मंदिराच्या भेटीदरम्यान दिली.
यावेळी त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. या मंदिराच्या परिसरात नवापूर शहरातील मृत्यू झालेल्या व्यक्तींचे दशक्रिया विधी पार पडत असते. या मंदिराला वॉल कंपाऊंड पेवर ब्लॉक तसेच विविध कार्यक्रमांसाठी सुसज्ज असा हॉल बनवून देण्याचे यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी सांगितले. मंदिराच्या सुशोभीकरण यासाठी लवकर निधी मंजूर करून या मंदिराच्या सुशोभित करण्याच्या कामाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी यावेळी उपस्थित रहिवाशांना सांगितलं. याप्रसंगी नवापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आयुब बलेसरिया, माजी नगरसेवक अजय पाटील, अनंत पाटील, सुनिल पवार, भुषण पाटील यांच्यासह नवापूर शहरातील नागरिक उपस्थित होते.