नवापूर शहरातील ४ ठिकाणी बोगदे तयार करण्यात यावे ; भाजपचे जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
नवापूर (प्रतिनिधी) महामार्गावरील नवापूर शहरातील ४ ठिकाणी बोगदे किंवा अंडरपास करणे तसेच महामार्गाच्या चौपदरीकरणमध्ये बाधित रहिवासी नागरीकांना निवासासाठी तातडीने पर्यायी जागा उपलब्ध करुन देणेबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मनिषा खत्री, तहसिलदार मंदार कुलकर्णी, मुख्यधिकारी विनायक कोते, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना भारतीय जनता पाटीतर्फे देण्यात आले आहे.
निवेदना मध्ये म्हटले आहे की, NH-6 महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत येणाऱ्या नवापूर जि. नंदुरबार शहाराच्या देवळफळी भागात जवळपास ५०/६० वर्षापुर्वीची नागरी वस्ती वसाहत करुन अनेक कुटुंब उदरनिर्वाह करीत असुन NH-6 च्या चौपदीकरणामुळे किमान ७० पेक्षा जास्त कुटुंब बाधित होत असल्याने त्यांना पर्यायी जागा उपलबध करुन देणेकामी तात्कालीन जिल्हाधिकारी, नंदुरबार तसेच मुख्याधिकारी, नगरपालिका, नवापूर यांना वेळोवेळी लिखीत पत्राव्दारे पर्यायी जागे उपलब्धते बाबत मी विनंती केलेली आहे परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे यासंदर्भात अद्यापपावेतो कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसुन या कामाविषयी दिरंगाई होत असल्याचे दिसुन येत आहे. वास्तविक नवापूर नगर पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत ठराव मंजुर करुन पर्यायी जागा उपलब्ध करुन देणे गरजेचे होते परंतु आजपावेतो तसा ठराव करण्यात आलेला नाही म्हणुन तीन दिवसाच्या आत कारवाई करण्यात यावी.
पत्रात उल्लेखीत मुद्या क्र-1 अन्वये, नवापूर शहरातील विद्युत वितरण कार्यालयासमोर 80 फुटी डी.पी. रस्ता मंजुर असुन, सदर रस्त्यास जोडण्यात आलेले रंगेश्वर नगर ,आदर्शनगर , वेडुभाऊ गोविंद नगर,गणेश हिल,लाखाणी पार्क,उपजिल्हा सामान्य रुग्णालय, नवापूर , औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, नवापूर तसेच धनराट, करंजी बु।। या मुख्य ग्रामीण भागातील गावांना जोडणारा रस्ता असल्याने नागरीकांना दैनंदिन गरजा भागविणेसाठी ये-जा करण्याकरीता NH-6 महामार्गाच्या नियोजनात जोड रस्ता अथवा (Underpass) बोगदा अशी कोणतीच नागरी सुविधा नसल्याने नागरीकांना भविष्यात महामार्ग ओलांडण्याकरीता अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे जोड रस्ता,बोगदा किंवा (Underpass) करण्यात यावा.
इस्लामपूरा या भागातील NH-6 महामार्गावरील नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनी नागरीकांना बाजारपेठ,बँक, शाळा-महाविद्यालय व दैनदिन गरजांकरीता शहरात ये-जा करावे लागते यासाठी देखील बोगदा किंवा (Underpass) करण्यात यावा. NH-6 महामार्गावरील नवापूर शहरातील शिवराम पाटील नगर या ठिकाणाहुन खाखर फळी येथे ये-जा करणेसाठी नागरीकांना अडचणीचे ठरणार असुन नवापूर (महाराष्ट्र) परीसर ते गुजरात राज्य सिमेला जोडणारा हा एकमेव प्रमुख रस्ता असल्याने या भागात नागरीकांची ये-जा असते त्या रस्त्याला देखील ये-जा करणेसाठी बोगदा किंवा (Underpass) याची नितांत आवश्यक आहे. तसेच NH-6 महामार्ग चौपदरीकरणाचे काम ज्या कंपनीला देण्यात आलेले आहे ते काम अत्यंत संथ व कासव गतीने सुरु असुन ठिक-ठिकाणावरील वळणरस्त्यावर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक न लावता चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने आजपर्यंत अनेक जिवीत अपघात होऊन अनेक नागरीकांचे बळी गेले आहेत अशा जिवीतहानीला जे.एन. मात्रे कंपनी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांचे कामाकडेस लक्ष नसल्याने तेच जबाबदार असुन त्यांच्यावर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच संदर्भ क्र-२ अन्वये मा. मुख्याधिकारी,नवापूर नगरपरीषद यांना कार्यपुर्ती अहवाल तात्काळ सादर करणेसाठी सुचित केलेले आहे.
वरील चारही मुद्यांना अनुसरुन शहरातील तसेच परीसरातील नागरीकांना विद्यार्थ्यांना दैनदिन गरजा भागविण्यासाठी जोड रस्ता, बोगदा किंवा (Underpass) होणेसाठी विनंती असुन वस्तीबाधित नागरीकांना पर्यायी जागा इ. मागण्यांचा योग्य तो निर्णय २६ जानेवारी २०२२ पुर्वी झाला नाही तर प्रशासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमा नंतर लगेच तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल निवेदनावर भारतीय जनता पाटीचे तालुका अध्यक्ष भरत गावीत, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल,युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश चौधरी,तालुका सरचिटणीस ओबीमोर्चा महेंद्र दुसाने,शहराध्यक्ष प्रणव सोनार,माजी नगरसेवक रमला राणा,शहर सरचिटणीस कृणाल दुसाने,शहराध्यक्षा महिला मोर्चा जिग्नेशाबेन राणा,शहर सरचिटणीस अजय गावीत,ओ बीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत जाधव,जिल्हा कार्यकारी सदस्या दुर्गा वसावे,शहर उपाध्यक्ष स्वनील मिस्ञी,जाकीर पठाण,माजी नगरसेविका सुनिता वसावे आदीच्या सह्या आहेत.



