महाराष्ट्र

शिंदखेडा येथे पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता कमेटीची बैठक, येणारे सण शसकीय नियमांचे पालन करून साजरे करण्याचा संकल्प

शिंदखेडा (यादवराव सावंत) येणारे सण अर्थात अक्षय्यतृतीया सोबत रमजान ईद हे सण शासकीय नियमांचे पालन करून साजरे करावे असा संकल्प शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आला.

बीजासनी मंगल कार्यालयात शिंदखेडा पोलीस स्टेशन चे पीआय सुनील भाबड यांनी सदस्यांना निमंत्रित करून बैठकीचे आयोजन केले होते. प्रसंगी गावातील हिंदू मुस्लिम समाजातील विविध पदाधिकारी नागरिक नगरसेवक माजी प.स. सदस्य पत्रकार राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रथम मीडियाच्या वतीने प्रा. प्रदीप दीक्षित यांनी शांततेच्या मार्गाने आपणा सर्वांना सण उत्सवाचा आनंद घ्यायचा असल्याचे आवाहन केले. माजी प.स. सभापती प्रा. सुरेश देसले म्हणाले शिंदखेडा शहर तसे शांत आहे. अनुचित प्रकार घडत नाही पण सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाने सतर्क राहून उत्साह वाढवावा असे सांगितले नगरसेवक दीपक अहिरे म्हणाले सध्याच्या मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरणार नाहीत. याची सर्वांनी काळजी घ्यावी डॉ. इंद्रिस कुरेशी म्हणाले आम्ही सर्व मुस्लिम बांधव शासकीय नियमांचे पालन करीत रमजान ईद साजरी करूअसे आश्वासन दिले.

मनसेचे स्वप्नील मोरे यांनीही आपलया शहरात शांतता असते असे म्हणत राज ठाकरेंचे म्हणणे काय आहे ते सांगितले. ते म्हणाले राज साहेब यांनी भोंग्याच्या आवाजबंद आवाहन केले आहे. त्यानुसार शांतता प्रिय भूमिका असल्याचा उल्लेख केला. नगरसेवक सुनील चौधरी म्हणाले आपल्या शहरात हिंदू मुस्लिम ऐक्य कायमस्वरूपी आहे. ते अबाधित ठेवा असे म्हटले जलाल शेख यांनीही अतिशय शांततेच्या मार्गाने सण साजरा करू असे अश्वसित केले.

शेवटी पीआय सुनील भाबड म्हणाले शासनाने ठरवून दिलेल्या चाकोरीत आपण रहावे मीडियाच्या माध्यमातून येणारे भडकावू मेसेज फारवर्ड करू नका तुम्हीही इतर मेसेज सेंड करू नका सायबरचे याबाबत बारीक लक्ष असणार आहे. काळजी घ्या उगाच कायदेशीर कार्यवाहीची वेळ येणार नाही याची खबरदारी घ्या असे आवाहन केले. कार्यक्रमास विविध पक्ष्याचे प्रतिनिधी त्यात शिवसेना तालुका प्रमुख गिरीश देसले, कॉग्रेस नगरसेवक उदय देसले, समता परिषदेचे दगा माळी कॉन्स्टेबल माळी उपस्थित होते. आभार पोलीस स्टेशनच्या माध्यमातुन व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे