महाराष्ट्र
दादासाहेब रावल हायस्कूल मध्ये जागतिक योगदिन साजरा
मालपुर : मालपुर ता.शिंदखेडा येथील दादासाहेब रावल हायस्कुल येथे जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. या वेळी योग शिक्षक एस.पी.भावसार यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले
तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या कडुन योगाचे प्रात्याक्षिक करून घेतले आणि सर्व प्रकारचे योग करून घेतले. या वेळी मुख्यध्यापक आर.डी. वसईकर, पर्यवेक्षक आर.बी. सुर्यवंशी व ज्युनिअर कॉलेज चे शेख, पी.व्ही. माळी सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.