जळगाव जिल्हा
महाराष्ट्र सदस्यपदी फिरोजा शेख यांची निवड
जळगाव (प्रतिनिधी) मुस्लिम महासंघाच्या कार्यकारणीचा विस्तार करून महाराष्ट्र सदस्यपदी फिरोजा शेख यांची निवड मुस्लिम महासंघाचे प्रदेश प्रभारी शबनम शेख यांनी केली.
जळगाव जिल्ह्यात मुस्लिम महासंघाचे कार्य विस्ताराची जबाबदारी फिरोजा शेख यांच्यावर वरिष्ठ पदाधिकारी यांनी सोपवली आहे. वरिष्ठांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही फिरोजा शेख यांनी दिली. फिरोजा शेख यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.