सूरमाज फाउंडेशनच्या वतीने रेशन किटचे वाटप
अक्कलकुवा : रमजानच्या या पवित्र महिन्यात तुम्ही जे काही चांगले काम कराल, त्यामध्ये आम्हाला ७०% अधिक गुण मिळतात. आणि ही विचारधारा डोळ्यासमोर ठेऊन सूरमाज फाऊंडेशनचे डॉ. मोहम्मद जुबेर शेख यांनी अक्कलकुवा शहरातील, मोठी राजमोवी, मीताफळी, सीता नगर, संजय नगर, सुरापाडा, सिकफळी, ताकवा मस्जिद, कुरेशी वाडा, बाजारपेठ, दर्गा रोड, हवालदार फली मकरणी फल्ली, अशा अनेक भागात, सर्व धर्माचे, गरीब, आणि गरजू लोकांना खाद्यपदार्थ कीड स्वरूपात वाटले. किटमध्ये तांदूळ, तेल, तुवर डाळ, साखर, चहा, साबण, धने, हळद आणि इतर अनेक दैनंदिन वस्तूंचा समावेश होता. जे एक कुटुंब सुमारे 8 दिवस खाऊ शकते.
वायरमन समीर पठाण, ताहीर शेख, तयेब मकरानी, जमील शेख, आदिल मकरानी, इर्शाद मेमन, मौलाना सैफुल्लाह मकरानी, हाफिज अब्दुल मतल्ली मकरानी, आकिब मकरानी या सर्व बांधवांनी हे काम पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे डॉ मोहम्मद जुबेर शेख यांनी त्या सर्वांचे मनापासून आभार मानले.