सोनगीर येथे शिवजयंती निमित्त राज्यस्तरीय वकॄत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
सोनगीर (गोपाल कोळी) येथे ‘सुवर्णगीरी किल्ल्याचा-मी एक मावळा’तर्फे सुवर्णगीरी किल्ल्यावर ध्वजारोहण करीत महामार्गालगत असलेल्या शिवकालीन तोफेचे व छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन वकृत्व स्पर्धेचे उद्याटन करण्यात आले. या स्पर्धेत 62 स्पर्धकांनी सहभाग नोंदवीला. तब्बल आठ तास चाललेल्या या स्पर्धेत प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपञ, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. श्रोत्यांना शिवचरिञाची बौद्धिक व वैचारीक मेजवानी मिळाली.
राज्यस्तरीय वकॄत्व स्पर्धेत सात हजाराचे प्रथम बक्षीस नमिता पाटील, पाच हजाराचे द्वितीय बक्षीस सारांश सोनार, तर तीन हजाराचे तृतीय बक्षिस प्रफ्फुल माळी यांनी मिळविले. तेजस्वीनी राजपुत, चिन्मय शेळके, मानव पाटील, किर्ती पवार, कोमल मराठे, कुलदीप माळी यांना उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली.सर्व स्पर्धकांद्वारे छञपती शिवरायांचे विविध पैलु,गुणवैशिष्टे,शिवविचारांचा जागर केला गेला. फेटेधारी स्पर्धक बालकांचा सहभाग लक्षवेधी होता.
राज्यस्तरीय वकॄत्व स्पर्धेची सुरुवात सुवर्णगीरी किल्ल्यावर ध्वजारोहन सोनगीर सरपंच रूख्माताई ठाकरे यांच्या हस्ते,तर व्याख्याते तथा अभ्यासक्रमातील कवी प्रेमचंद अहिरराव, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नाशिक विभागाध्यक्ष डाॅ अजय सोनवणे, इतिहास संशोधक व व्याख्याते प्रा लिलाधर पाटील,अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक तिलोत्तमाताई पाटील ,जिप सदस्य प्रतिनीधी ज्ञानेश्वर चौधरी, आपचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक, अनिल पवार, योगेश पवार,कापडणे पंस सदस्य राजेंद्र बाबुराव पाटील,,प्रविण प्रकाश पाटील(धनुर), ,कपिल अशोक पाटील,किशोर सोमवंशी आदी मान्यवरांच्या उपस्थित झाले
तदनंतर पोलीसस्टेशन समोरील पुरातन तोफेचे पुजन पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुञ्यंबक हाॅल मध्ये छञपती शिवरायांच्या अर्धाकॄती पुतळा पुजन हाॅलचे संचालक महेंद्र ञ्यंबक देवरे यांच्या हस्ते करून सर्व मान्यवरांनी सामुहिक अभिवादन केले.
बक्षीस वितरण भाजपा शिंदखेडा तालुकाध्यक्ष प्रा डाॅ आर जी खैरनार,सुप्रसिद्ध धन्वतरी डाॅ अजय सोनवणे, दापुरा सरपंच किशोर पाटील, बाभळे सरपंच प्रतिनीधी समाधान पाटील, परिक्षक प्रा लिलाधर पाटील,परिक्षक प्रेमचंद अहिरराव, काळे सर,(नरडाणा)नरेंद्र पवार,सागर पटेल,आयोजक ईश्वर पाटील,अनिल पवार,यांच्या हस्ते करण्यात आले.योगेश पवार,युवराज अर्जुन पाटील(वाघाडी),प्रशांत जीने,हर्शल पवार,प्रमोद पवार यांचे सहकार्य लाभले..प्रस्तावना व सुञसंचलन डाॅ अजय सोनवणे,आभार अनिल पवार यांनी मानले.