महाराष्ट्र

क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

नंदुरबार (प्रतिनिधी) येथील क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अधक्ष खा.डॉ.हिनाताई गावीत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून क्षत्रिय मराठा मंच मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद लक्ष्मण मराठे, ऑल इंडीया न्युज पेपर असोसिएशनचे अध्यक्ष पत्रकार सुर्यभानआबा राजपूत, मराठा पंच मंडळाचे माजी अध्यक्ष श्रावण मराठे, नगरसेवक गजेंद्र शिंपी, नगरसेवक आकाश चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष नितीन राजपूत, भिमआर्मीचे जिल्हाध्यक्ष संजय रगडे, संतोष वसईकर, व्यापारी संघाचे बळवंत जाधव, अर्जुन रामदास मराठे, रोहिदास पवार, अशोक राजपूत, मोहिनीराज राजपूत, भिमसिंग राजपूत, संदीप चौधरी, हरीष हराडे, महेंद्र मराठे, क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण महेश मराठे, उपाध्यक्ष पप्पू मराठे आदी उपस्थित होते. यावेळी खा.डॉ.हिनाताई गावीत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन उपस्थितांना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी नगरसेवक गजेंद्र शिंपी म्हणाले की, आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महारांचा आदर्श घ्यावा. नुसते बुलेटवर जगदंब लिहून दाढी वाढवून, कपाळाला टिका लावून शिवाजी महाराजांचेे विचार आपल्या अंगीकृत होत नसून त्यांचे जीवनचरित्र वाचून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचविणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी स्त्रीयांचा सन्मान केला आहे. त्याचा आदर्श घेवून प्रत्येक युवकाने आपल्या आई-बहिणीचा तसेच समाजातील प्रत्येक स्त्रीचा आदर करावा. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश गवळे सर यांनी केले. तर आभार क्षत्रीय मराठा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण महेश मराठे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपेंद्र राजपूत, धीरज मराठे, यशराज मराठे, दीपक मराठे, मुकेश मराठे, पवन बागूल, राजेंद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे