शिवना येथील ईफ्तार पार्टीत सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
सिल्लोड : शिवना येथील आयोजित ईफ्तार पार्टीत सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मता दिसून आली. या ईफ्तार पार्टीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह साधू संत व सर्व धर्मीय नागरिकांची उपस्थिती होती.

येथील व्यापारी राजूबाबा काळे यांच्या वतीने शनिवार (दि.30) रोजी या ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख देविदास पा. लोखंडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, पं. स. सदस्य शेख सलीम, अशोक सूर्यवंशी रमेश सपकाळ माजी पंचायत, माजी पं. स. सदस्य दत्ता सोनवणे, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, विशाल जाधव, कृउबा समितीचे संचालक सतीश ताठे ,माजी जि. प. सदस्य मुरलीधरराव काळे, भिका वाघ, राजूबाबा काळे, उपसरपंच गणेश सपकाळ, सुधाकर काळे, पप्पू राऊत, विलास काळे, प्रमोद दौड, राजेंद्र काळे, रवींद्र काळे आदींसह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





