महाराष्ट्र

काय सांगता ! ‘या’ शेअर्सवर TAX भरावा लागेल ; जाणून घ्या..कुणाला भरावा लागेल टॅक्स

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आपल्या भारतीय संस्कृतीत गिफ्ट घेण्या-देण्याची जूनी परंपरा आहे. पण या गिफ्टच्या यादीत आता रूपये-पैसे, महागड्या गाड्या, महागडी घरे आणि सोबतच सोने चांदी आणि शेअर्ससुद्धा समाविष्ट झाले आहेत. आता अशा गिफ्ट्सवरील कर नियमांबाबतही एकदा नक्की जाणून घ्या. खासकरून शेअर्सबाबतीत. देशात आधी गिफ्ट टॅक्स अॅक्ट आकारला जात होता. यात गिफ्ट देणाऱ्यावर गिफ्ट टॅक्स आकारला जात असे. पण नंतर हा टॅक्स काढून काढण्यात आला.

इनकम टॅक्सच्या अनुसार, ज्यावेळी कॅपिटन एसेटचं ट्रान्सफर होतं, त्यावेळी कॅपिटल गेन्स लागू होतं. इनकम टॅक्स अॅक्टमधलं सेक्शन ४७ मध्ये ‘ट्रान्सफर’ आणि ‘गिफ्ट’ हे दोन वेगळे करण्यात आलेत. याचाच अर्थ असा की, गिफ्ट हे कॅपिटन गेन्समध्ये मोडत नाही. म्हणूनच जेव्हा कुणी आपल्याला एखादं गिफ्ट देतं त्यावेळी त्याला कोणताही इनकम टॅक्स द्यावा लागत नाही. पण गिफ्ट घेणाऱ्यावर कर आकारण्याचा नियम आहे.

इनकम टॅक्सचा नियम

इनकम टॅक्स कलम ५६ (२) नुसार, कोणतीही संपत्ती म्हणजेच शेअर, ईटीएफ, म्युच्युअल फंड, ज्वेलरी, ड्रॉइंग ज्याची किंमत ही फेअर मार्केट व्हॅल्यू ५० हजार रूपयांपेक्षा अधिक असेल, तर असे गिफ्ट्स घेणाऱ्याला टॅक्स द्यावा लागतो. अशा कोणत्याही इनकमला आयटीआर म्हणजेच ‘इनकम फ्रॉम अदर सोर्सेस’ मध्ये दाखवावं लागतं आणि गिफ्टवर आपल्या स्लॅब रेटनुसार टॅक्स भरावा लागतो.

तसंच यात काही सवलतींचा देखील समावेश आहे. एखादा व्यक्ती तर आपल्या कुटूंबातील व्यक्ती किंवा जवळच्या नातेवाईकांकडून गिफ्ट घेत असेल तर त्यावर टॅक्स आकारला जात नाही. लग्नात घेतलेल्या गिफ्ट्सवर सुद्धा कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. जर एखाद्या व्यक्तीला वारसाने गिफ्ट मिळालं तर त्यावरही त्याला टॅक्स भरण्याची गरज नाही. शेअऱ, ईटीएफ आणि म्युच्युअल फंड सारखे गिफ्ट्स असतील तर ते ‘इनकम फ्रॉम कॅपिटल गेन्स’मध्ये येतं आणि त्यावर टॅक्स भरावा लागतो. गिफ्ट देणाऱ्या व्यक्तीला ‘आयटीआर-२’ भरावा लागतो आणि त्यावर स्लॅब रेटनुसार टॅक्स द्यावा लागतो.

कशी असते कर रचना?
गिफ्ट किंवा वारसाने मिळालेल्या शेअर्सवर शॉर्ट टर्म कॅपिटन गेन आकारलं जातं की लॉंग टर्म कॅपिटल गेन ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. हे जाणून घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला होल्डिंग पिरीयड जाणून घेणं गरजेचं आहे. ज्याने शेअर्स विकले आहेत, ज्या व्यक्तीकडे किती दिवसांपर्यंत शेअर होल्ड होतं, हे सर्वात आधी जाणून घ्या. त्या व्यक्तीने हे गिफ्ट कधी घेतलं होतं आणि किती महिने किंवा वर्षानंतर त्याने हे गिफ्ट दुसऱ्या व्यक्तीला विकले हे, या दरम्यानचा काळ आधी पाहावं लागेल. या अवधीवरूनच टॅक्सचा स्लॅब रेट पाहिला जातो. या अवधीमध्ये एखादी गडबड करून यावरचा टॅक्स भरला गेला असले तर त्यावर इनकम टॅक्स विभाग तुमच्याविरोधात कारवाई करू शकतं. या कारवाईपासून वाचण्यासाठी गिफ्ट देणारा आणि घेण्याऱ्याने सुद्धा ट्रांजेक्शनचे सर्व कागदपत्रे जवळ ठेवावे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे