मुक्ताईनगर येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
मुक्ताईनगर (सचिन झनके) शैलेश गुरचळ आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुकळी तालुका मुक्ताईनगर येथे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराचा लाभ सुकळी गावातील ग्रामस्थांना जास्तीत जास्त प्रमाणात घेता यावा यासाठी नगर विकास मंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने आणि मुक्ताईनगर विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा संपर्क समन्वयक जितेंद्र गवळी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उपजिल्हा समन्वयक पवन सोनवणे यांच्या नेतृत्वात पार पडला.
या शिबिरामध्ये सुकळी येथील शिवसैनिक कल्पेश पाटील यांनी अनमोल सहकार्य केले त्यांच्यात सहकार्याने गावातील असंख्य ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि त्यापैकी काही लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन गोदावरी हॉस्पिटल जळगाव या ठिकाणी करण्यात आले. प्रमिला बाविस्कर विमल राठोड, पंडीत कोळी, दत्तू चिंतामणी, जगन्नाथ पाटील, विश्वनाथ पाटील, बाळू धनगर, गयाबाई कोळी, पुंडलिक पाटील या ग्रामस्थांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात आले आहे. तरी या सर्वांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा समन्वयक जितेंद्र गवळी आणि उपजिल्हा समन्वयक पवन सोनवणे यांचे आभार मानले आहे. त्याचप्रमाणे पुढेही वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबीर राबवले जाणार आहेत. यामध्ये मुक्ताईनगर मतदार संघातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उपजिल्हा समन्वयक आणि युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे यांनी केले आहे.