कुरखडीजवळ उसाच्या आयशरची ट़्रक्टरला धडक ; तरुण जागीच ठार, पाच गंभीर जखमी
शिंदखेडा (यादवराव सावंत) ऊस भरून भरधाव जाणाऱ्या आयशर वाहनचालकाने ट्रॅक्टर ला जोरदार धडक दिली. यात आयशर मधील उसाखाली दाबला गेल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर पाच गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना आज पहाटे मुंबई आग्रा महामार्गावरील कुरखडी (ता.शिरपुर) शिवारात घडली.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाने मध्यप्रदेशातून ऊस घेऊन धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव आयशर ने कुरखडी येथुन येणाऱ्या ट्रॅक्टर ला आज पहाटे जोरदार धडक दिली.या भिषण अपघातात आयशर मधील उसाखाली दाबला गेल्याने ट्रॅक्टर मधील अर्जुन हसरत भिल (वय ३०) रा.दोंडायचा ह.मु.कुरखडी ता.शिरपुर यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात राजु पुंजु भिल ( वय ३२) छगन बळीराम भिल ( वय ४२) दयाराम देवराम भिल (वय ४६) भाईदास रामदास भिल (वय ४५) सर्व रा.कुरखडी यांच्या सह आयशर चालक राहुल जाजुराम जाधव ( वय २६) रा.असलपुर ता.महु जि.इंदोर जखमी झाले.जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याच्यांवर उपचार सुरू असुन काहींची प्रकृती चिंताजनक आहे.या प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. सदर घटनास्थळी दोंडाईचा येथील व भिल समाज विकास मंचचे जिल्हा सचिव अशोक सोनवणे यांच्या सह समाज व मित्र मंडळ जावुन पाहणी केली. तसेच मयत कुटुंबातील सदस्यांना धीर देत दोंडाईचा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.



