अमळनेरात येथील सट्टा जुगार अड्यावर धाडी टाकून मुद्देमाल जप्त
उप विभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधवांनी आवळल्या मुसक्या
अमळनेर (नुरखान) येथील उप विभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधवांनी शहरात सुरू असलेल्या मटका सट्टा जुगार अडयावर धाड टाकून मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की,शहरात अनेक ठिकाणी हिरवे पडदे लावून सरार्स पणे अवैध धंदे चालू असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत असल्याने नागरिकांनी तोंडी तक्रारी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या कडे केल्याने त्यांनी आपल्या सूत्रांकडून माहिती गोळा करून आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तीन टीम बनवून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील झामी चौकात कसलीमोहल्ला रस्त्यालगत विठ्ठल सनासे नामक व्यक्ती गैरकानुनी मटका जुगार चालवत असल्याचे आढळून आल्याने धाड टाकून एकूण रक्कम ७९४०रुपये व इतर साहित्य ताब्यात घेतले,तर सपोनि राकेशसिंग परदेशी यांनी पोउपनी नरसिंह वाघ सह पोलिस कर्मचारीनीं दगडी दरवाजा जवळ रमेश अहिरे नामक व्यक्ती कल्याण मटका सट्टा जुगार अड्डा चालवत असल्याचे आढळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन एकूण रोख रक्कम ७१० व साहित्य जप्त केले व शहरातील झामी चौकात टपरीच्या आडोश्याला अरमान फकीर हा बेकायदेशीर मटका जुगार चालवत असल्याने पोउपनी गंभीर शिंदे यांनी आपल्या सहकार्य सोबत अचानक धाड टाकून अरमान फकीर सह रोख रक्कम ५३० रुपये सह जुगार साहित्य ताब्यात घेतले व वरील तिन्ही आरोपी वर महा जु अ कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याकामी पोहेकॉ मेघराज महाजन,पोक गणेश पाटील,नापोक संजय बोरसे,पोना योगेश महाजन,पोकॉ गणेश पाटील आदींनी सहभाग घेतला.
उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी सदर कारवाई चा बडगा उगारत येणाऱ्या काळात बेकायदेशीर काम करणाऱ्याची हयगय केली जाणार नाही याची चुणूक दाखवल्याने या निर्णयाचा सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.